इंग्लंडमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडकडून सपाटून मार खाल्ला आहे.
या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रलियाला ५-० अशा फरकाने पराभूत करत व्हाइट वॉश दिला.
कर्णधार टीम पेनने या एकदिवसीय मालिकेनंतर झालेल्या पत्रकार परीषदेत ऑस्ट्रेलियन संघाची पाठराखण केली.
तसेच २०१९ च्या विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या शर्यतीतून ऑस्ट्रेलियाला इतक्या लवकर बाहेर काढण्याची घाई करु नका असे सुचवले आहे.
“आमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे विश्वचषक स्पर्धेत खेळले आहेत आणि जिंकले सुद्धा आहेत पण ते सध्या संघात नाहीत. त्यांना विश्वचषक जिंकण्यासाठी काय लागतेय याचा अनुभव आहे.” असे ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणाला.
“विश्वचषक स्पर्धेला जवळपास एक वर्ष बाकी आहे. त्यापूर्वीच कोणी ऑस्ट्रेलियन संघाच्या विश्वचषकाच्या कामगिरीविषयी भाष्य करु शकत नाही. ज्यावेळी आमचा सर्वोत्तम संघ मैदानात असतो त्यावेळी आम्हाला कोणी रोखू शकत नाही.” असे टीम पेन विश्वचषकाविषयी बोलताना म्हणाला.
मार्च महिन्यातील बॉल टेंम्परींग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद टीम पेनकडे देण्यात आले आहे.
टीम पेनने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केलेल्या एक कसोटी व इंग्लंड विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
त्यामुळे त्याच्या कर्णधार पदावरही अनिश्चिततेची टांगती तलवार आहे.
तसेच अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.२७ जूनला इंंग्लंड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बटलर वादळाने चौथ्यांदा केला टीम आॅस्ट्रेलियाचा पालापाचोळा!
-केवळ १ धाव देत ७ फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता, सामनाही जिंकला!