भारतीय क्रिकेटला हादरवणारी बातमी पुढे येत आहे. सोमवारी (२२ ऑगस्ट) राजस्थानमधील जोधपुर शहरात झालेल्या रस्ता अपघातात एका क्रिकेटपटूचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. करवड पोलीस ठाण्यांतर्गत नागौर महामार्गावर नेताडाजवळ मिनी बस आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या धडकेत क्रिकेटपटूचे अकनाक निधन झाले आहे. हा क्रिकेटपटू मिनी बसमधून प्रवास करत होता. त्याच्यासोबत इतर १३-१४ खेळाडूही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल गावात आयोजित एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी सीकर जिल्ह्यातील क्रिकेटपटूंचा संघ जोधपूरला आला होता. ही स्पर्धा संपल्यानंतर हा संघ मिनी बसने सीकरला परतण्यासाठी निघाला होता. परंतु अर्ध्या मार्गात त्यांच्या मिनी बसचा अपघात झाला. नागौर हायवेवरील नेतडा गावातील एका रिसॉर्टजवळील रस्त्यावर वेगाने येत असलेल्या ट्रेलरने क्रिकेटपटूंनी भरलेल्या मिनी बसला जोराने धडक दिली.
ही अपघात इतका भीषण होता की, बसमध्ये सवार एक क्रिकेटपटू बाहेर उडून पडला आणि ट्रेलरच्या खाली आला. यानंतर त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित केले गेले. या अपघातात इतर १३-१४ क्रिकेटपटूंनाही दुखापती झाल्या आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. मृत क्रिकेटपटूच्या नातेवाईकांनी ट्रेलर चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर पूरनचा दमदार सिक्स, पाहा व्हिडिओ
ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी
न्यूझीलंड क्रिकेटमधील सुवर्णक्षण! इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा