---Advertisement---

अवघ्या ८ चेंडूत युएईत आणलं वादळ, पीएसएलच्या एका सामन्यात सुपरस्टार बनला ‘हा’ पठ्ठ्या

On: सोमवार, जून 14, 2021 2:57 PM
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेट खेळणारा खेळाडू क्रिकेट खेळताना एक स्वप्न पाहत असतो की, एक दिवस मी सुद्धा माझ्या संघासाठी उत्कुष्ट कामगिरी करीन आणि जगभरात प्रसिद्ध होईन. कधी-कधी काही खेळाडूंना प्रसिद्ध होण्यासाठी खूप वेळ लागतो परंतु, काही असे नशीबवान खेळाडू असतात, जे दोन-तीन सामन्यातच प्रसिद्ध होतात. असाच एक प्रसंग सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये घडला आहे. या युवा गोलंदाजाचे नाव रातोरात सगळीकडे झळकले आहे. माहिती करून घेऊया या बातमीतून कोण आहे तो गोलंदाज?

बोलतात न की क्रिकेटमध्ये जर एखाद्या खेळाडूचा दिवस असेल तर त्याला कोण रोखू शकत नाही. असेच काही पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात दिसून आले. मुलतान सुल्तास विरुद्ध पेशावर जाल्मी यांचात झालेय सामन्यात ‘शाहनवाज धानी’ या गोलंदाजाने अशी काही गोलंदाजी केली की, एकाचा सामन्यात तो ‘सुपरस्टार’ झाला.

मुलतान संघाकडून खेळताना धानीने पेशावर संघाचे ४ खेळाडू बाद केले. त्याने आपल्या झोळीत हैदर अली (२८), कामरान अकमल (३५), शोएब मलिक (०) आणि रोवमन पॉवेल (२२) यासारख्या फलंदाजांची विकेट टाकली. त्यामुळे त्याला त्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

धानीने ८.४ षटकापासून ते १०.५ षटकापर्यंत ८ चेंडू फेकले. त्याने नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अकमल आणि पाचव्या चेंडूवर मलिकला बाद केले. शेवटच्या चेंडूवर त्याला हॅट्रिक घेण्याची संधी होती, ती मात्र चुकली. तसेच अकराव्या षटकाच्या पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर २ गडी बाद केले.

धानीच्या वडिलांना आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचे नव्हते. त्यांना आपल्या मुलाला सरकारी साहेब बनवायचे होते. पण नशिबाने त्याला क्रिकेटकडे ओढलं आणि तो क्रिकेटर झाला. शाहनवाज धानीचा जन्म ५ ऑगस्ट १९९८ रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लरकाना गावात झाला होता.

आजवर धानीने ८ फर्स्ट क्लास, ६ लिस्ट ए आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. या हंगामात त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान सुपर लीगच्या आतापर्यंतच्या सामन्यात तो सर्वाधिक बळी घेण्याचा यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला आजवर पाकिस्तानसाठी पदार्पण करता आले नाही. येत्या वेस्टइंडीज दौऱ्यासाठी त्याला पाकिस्तानच्या चमूत घेतले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलस! आफ्रिदीच्या जावयाची खेळाडू वृत्ती, बाद झालेल्या फलंदाजाचा ‘असा’ वाढवला उत्साह

किवींसाठी धोक्याची घंटा! कसोटी चॅम्पियनशीपच्या लढतीपुर्वी इंग्लंडमध्ये ‘सर जडेजा शो’चे दर्शन

मिलरच्या किलर फलंदाजीला दुर्दैवी ब्रेक, गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने १० फूट दूर उडाली दांडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---