मुंबई । भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा आता दुखापतीतून बरा झाला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तो पुन्हा आपल्या क्रिकेटच्या सरावाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मात्र रोहीत शर्माला भारतीय क्रिकेट संघात परतण्यासाठी त्याला पुन्हा द फिटनेस टेस्ट पास व्हावे लागणार आहे.
रोहितला फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यात दुखापत झाली होती त्यामुळे हा दौरा मध्येच सोडून त्याला मायदेशी परतू लागले होते.
लॉक डाउन पूर्वीच मी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार होतो. माझे फिटनेस टेस्ट होणे बाकी होते परंतु लॉकडॉऊन संपल्यानंतर मी एनसीएमध्ये जाऊन फिटनेस टेस्ट देईल आणि त्यानंतर माझा सरावाला सुरुवात करेन, असे काही दिवसांपूर्वी रोहितने आपल्या फेसबुकद्वारे चाहत्यांना सांगितले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात विराटच्या जागी रोहित शर्मा नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत होता. त्यावेळी रोहित शर्माने लेग स्पिनर ईश सोढीच्या चेंडूवर धक्का मारल्यानंतर त्याचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे तो 60 धावा काढून रिटायर हर्ट होऊन ड्रेसिंग रूममध्ये परतला होता.
तेव्हापासून रोहित क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो वेगवेगळ्या सोशल माध्यमांवर लाईव्हच्या माध्यमातून खेळाडू व चाहत्यांशी संवाद साधत आहे.
वाचा- ‘फलंदाज’ म्हणून गोलंदाजांनी केले ‘हे’ ५ जागतिक विक्रम; भारताचा खेळाडूही यादीत