रोहित शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत आहे. त्यानं क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सध्या तो सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. इतकं असूनही त्याला टीम इंडियाला अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देता आलेली नाही. अशातच आगामी आयसीसी टी20 विश्वचषक 2024 पूर्वी त्यानं आपल्या निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे.
रोहित शर्मा कधी घेणार निवृत्ती?
भारतीय कर्णधार रोहित शर्मानं निवृत्तीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की, “मी अजून तरी निवृत्तीबद्दलचा विचार केलेला नाही. मला स्वत:लाही नाही माहित की, जीवन मला कुठपर्यंत घेऊन जाईल. मी आताही चांगला खेळत आहे. त्यामुळे आणखी काही वर्ष खेळत राहण्याचा माझ्या मनात विचार आहे. मला आगामी टी20 विश्वचषक जिंकायचा आहे. त्यासोबतच 2025 ची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकायचंही माझं लक्ष्य आहे.”
आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वीही केलं होतं विधान
आयपीएल 2024चा हंगाम सुरु होण्यापूर्वी रोहितनं आपल्या भविष्याबद्दल बोलताना सांगितलं होत की, “ज्या दिवशी मला वाटेल आता मी पहिल्यासारख क्रिकेट खेळू शकत नाही, त्यादिवशी मी क्रिकेट खेळायचं सोडून देईल. मला असं वाटत आहे की, मी मागील 2-3 वर्षापासून माझा खेळ अधिक चांगला केला आहे.”
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. तो कर्णधार असताना त्यानं मुंबईला 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकून दिलं आहे. या हंगामात मात्र तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. यावर्षीचं त्याचं प्रदर्शन ठीकठाक राहिलं असलं तरी मुंबईचा फॉर्म चांगला नाही. मुंबईनं आतापर्यंत 5 सामने खेळेले आहेत. त्यापैकी त्यांचा 3 सामन्यांत पराभव झाला असून, 2 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे. मुंबईचा संघ 4 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना सीएसके विरुद्ध 14 एप्रिलला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“माझ्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो”, विनेश फोगाटचे WFI अध्यक्षांवर गंभीर आरोप
आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO
एकच वादा सूर्या दादा! अवघ्या 17 चेंडूत ठोकलं अर्धशतक अन् मोडले अनेक विक्रम