---Advertisement---

सौरव गांगुलीने आरपी सिंगसह या माजी खेळाडूंना बीसीसीआयमध्ये दिली मोठी जबाबदारी

On: शनिवार, फेब्रुवारी 1, 2020 7:06 PM
---Advertisement---

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC)भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल (Madan Lal), आर. पी. सिंग (R. P. Singh) आणि सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) यांची शुक्रवारी (31 जानेवारी) निवड करण्यात आली.

त्यामुळे आता या तिघांवर वरिष्ठ निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) आणि माजी सदस्य गगन खोडा (Gagan Khoda) यांच्या बदली नवीन सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी असणार आहे.

मदन लाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक या क्रिकेट सल्लागार समितीच्या नवीन सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षांसाठी असेल.

या समितीमध्ये उत्तरप्रदेशचा आरपी सिंग हा सर्वात युवा सदस्य असून त्याचे वय 34 वर्षे आहे. तर, मदन लाल 68 आणि सुलक्षणा नाईक 41 वर्षांचे आहेत.

मदन लाल यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना 39 कसोटी सामने आणि 67 वनडे सामने खेळले आहेत. तसेच ते 1983चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्यदेखील होते. आरपी सिंगने भारताकडून आतापर्यंत 14 कसोटी, 58 वनडे आणि 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर तो 2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.

तसेच नाईक यांनी आपल्या 11 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत भारतीय महिला संघाकडून 2 कसोटी सामने, 46 वनडे सामने आणि 31 टी20 सामने खेळले आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1223565810016194561

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---