भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयकडे 3000 हून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी ते नरेंद्र मोदी, अमित शहा यांसारख्या नावांचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, मोदी-सचिन-धोनीसारख्या प्रसिद्ध लोकांच्या नावाचा वापर करून अर्ज करणारे लोक बनावट वापरकर्ते आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची 27 मे अंतिम तारीख होती.
भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ केवळ टी-20 विश्वचषकापर्यंत आहे. बीसीसीआय द्रविडच्या जागी नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्याअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मंडळाने आपल्या वेबसाईटवर गुगल फॉर्मची लिंक दिली होती, ज्याद्वारे अर्ज करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे पर्यंत भारतीय प्रशिक्षक होण्यासाठी 3000 हून अधिक अर्ज आले होते. यातील अनेक अर्ज केवळ नावावर आहेत. सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी, अमित शहा यांसारख्या लोकांची नावे वापरून केलेले अर्ज या श्रेणीत गणले जात आहेत.
बीसीसीआयला अशा परिस्थितीचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी, जेव्हा रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून करार संपला आणि बीसीसीआय असाच काहीसा प्रयत्न करत होता. तेव्हा बीसीसीआयला मेलद्वारे 5000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतेक अर्ज बनावट होत्या.
या अर्जांशी संबंधित ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रश्नावर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वेळीही बीसीसीआयकडे असे अर्ज आले होते. याचे कारण म्हणजे बीसीसीआयने गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले होते. त्याचा फायदा असा आहे की, गुगल फॉर्मद्वारे प्राप्त झालेल्या अर्जांची क्रमवारी लावणे सोपे आहे.
मात्र, कोणत्या खेळाडूंनी प्रशिक्षक होण्यासाठी गांभीर्याने अर्ज केला होता, हे बोर्डाच्या अधिकाऱ्याने उघड केले नाही. या शर्यतीत गौतम गंभीरचे नाव आघाडीवर मानले जात आहे. मात्र गंभीरने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जस्टिन लँगर आणि रिकी पाँटिंग ही ऑस्ट्रेलियन जोडी आधीच वादाच्या बाहेर आहे, बीसीसीआयने या पदासाठी संपर्क साधल्याचा दावा खोडून काढला आहे. आता आश्यामध्ये प्रशिक्षक पदासाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीआयला प्रशिक्षकासाठी गौतम गंभीरशिवाय दुसरा पर्याय नाही, जाणून घ्या बातमीद्वारे
अर्रर्र… रियान परागनं हे काय केलं? युट्युबची सर्च हिस्ट्री झाली व्हायरल पाहा व्हिडीओ
ही “ऑरेंज कॅप” तुम्हाला आयपीएल ट्राॅफी जिंकून देत नाही अंबाती रायडूचे परखड वक्तव्य