ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने मेलबर्न येथील आपले घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना वॉर्नने हा निर्णय घेतला आहे.
वॉर्नचे (Shane Warne) हे घर अनेक सुविधांनी सजलेले आहे. त्याच्या घराचा लिलाव पुढील महिन्यात ४ एप्रिलला करण्यात येईल. यामध्ये त्याला करोडोंचा फायदा होणार आहे.
वॉर्नने हे घर एस्सेंडन फुटबॉल क्लबचा खेळाडू मॅथ्यू लॉयसकडून २०१८ मध्ये ४० कोटी रुपयांना विकत घेतले होते. या घराची सध्याची किंमत जवळपास ५५ कोटी रुपयांना आहे. अशामध्ये २ वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या या घरामुळे वॉर्नला तब्बल १५ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
या घरामध्ये आधुनिक सुविधांचा भरपूर वापर करण्यात आला आहे. यामध्ये ५ बेडरूम, ५ बाथरूम, वाईन सेलर, बार, होम थिएटर, स्विमिंग पूल आणि स्पा अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे.
वॉर्नने हे घर विकण्याचा निर्णय घेतला आहे कारण आता त्याला सेंट किल्डामध्ये (St Kilda) लक्झरी अपार्टमेंट खरेदी करायचे आहे.
वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००१ विकेट्स घेतल्या आहेत. तर श्रीलंकेचा फिरकीपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने (Muttiah Murlitharan) सर्वाधिक १३४७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे वॉर्न या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच या यादीत भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) ९५६ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी कसोटीत सर्वाधिक ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.
वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची परंपरा असणारा ‘बॅगी ग्रीन’ (Baggy Green) कॅप अनेक वर्षांपर्यंत घातली होती. परंतु त्या कॅपचा लिलाव करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामधील जंगलाला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी वॉर्नने आपल्या कॅपचा लिलाव केला होता.
या लिलावात ही कॅप १०,०७,५०० डॉलरमध्ये विकली गेली. म्हणजेच ४ कोटी ९२ हजारपेक्षा अधिक रुपयांना ही कॅप विकण्यात आली होती. अशाप्रकारे वॉर्नची कॅप क्रिकेट इतिहासात विकली गेलेली सर्वात महागडी वस्तू आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–हेल्मेट घालून गोलंदाजी करणारा अँड्र्यू एलिस निवृत्त
-एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?