कोरोना व्हायरसने सपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वच क्रीडा स्पर्धा एकतर रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलही स्थगित करण्यात आली आहे. याबरोबरच ऑलिंपिकही १ वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. या सर्वांनंतर आता दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौराही रद्द करण्यात आला आहे.
या व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेचा जूनमध्ये होणारा श्रीलंका दौरा (South Africa Tour of Sri Lanka) सोमवारी (२० एप्रिल) रद्द करण्यात आला. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला जूनच्या सुरुवातीला श्रीलंका संघाबरोबर ३ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळायचे होते.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी डॉ. जॅक फॉल (Dr Jacques Faul) यांनी सांगितले की, “दक्षिण आफ्रिका संघाला लॉकडाऊनमुळे या दौऱ्यासाठी तयारी करता आलेली नाही. याव्यतिरिक्त खेळाडूंच्या आरोग्याची काळजी आमची प्राथमिक जबाबदारी आहे. आम्हाला या निर्णयाचे वाईट वाटत आहे. आम्ही लवकरच या दौऱ्याच्या नव्या वेळापत्रकावर चर्चा करणार आहोत.”
JUST IN: South Africa's tour to Sri Lanka scheduled to take place in first half of June has been postponed.
New dates are yet to be decided. pic.twitter.com/djPnhCNLEy
— ICC (@ICC) April 20, 2020
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला कोरोनामुळे एकही सामना न खेळता परत जावे लागले होते. या दौऱ्यात ३ वनडे सामने खेळायचे होते. यातील पहिला सामना धरमशाला येथे होणार होता. जो पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
यानंतर उर्वरित २ वनडे सामने कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (Cricket South Africa) खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेत आपसातील सहमतीने मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडचा संघही श्रीलंका दौऱ्यात एकही सामना न खेळता आपल्या मायदेशात परतला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-काही लोकांना झेलणं अवघडं आहे, त्यांच्याबरोबर बसायलाही भिती वाटते
-केदार म्हणतो, या दोन दिग्गजांमुळे बदलली माझी गोलंदाजीची शैली
-गरीब मुलांच्या मदतीला धावुन आला केएल राहुल, करणार ही मदत