टी20 विश्वचषक 2024 च्या सेमीफायनल-1 मध्ये अफगाणिस्तानला मात देत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आफ्रिकेने पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. आफ्रिकेने 67 चेंडूत 9 विकेट्स शिल्लक असताना विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून राशिद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्याच्यावरच उलटला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाने गुडघे टेकले. अझमतुल्ला ओमरझाई व्यतीरिक्त कोणत्याही फलंदाजास दुहेरी धावसंख्या पार करता आले नाही. केल्या, अझमतुल्लाने सर्वाधिक 12 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. अफगाणिस्तानचा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकांत 56 धावा करुन सर्वबाद झाला.
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 8.5 षटकात 1 विकेट गमावत सामना आपल्या नावे केला. आफ्रिकाने रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम यांच्या नाबाद 55 धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला आहे. रीझा हेंड्रिक्सने 25 चेंडूत 29* तर एडन मार्कराम 21 चेंडूत 23* धाा केल्या. या विजयनंतर एडन मार्करामच्या नेतृत्तवाखालील दक्षिण आफ्रिकासंघाने इतिहास रचत टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच फायनमध्ये स्थान मिळवले आहे.
टी20 विश्चचषक 2024 च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज 27 जून रात्री 8 वाजता गयाना येथे सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने जर सामना रद्द झाल्यास भारत थेट अंतिम फेरी गाठु शकते. असे झाल्यास टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्तवाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका समोर अफगाणिस्तानंच लोटागंण, सेमीफायनलमध्ये 56 धावांत सर्वबाद
आश्चर्यकारक! यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित-बटलरची आकडेवारी समान
विराट कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा ‘हा’ गोलंदाजी रेकाॅर्ड निघणार का मोडीत?