---Advertisement---

भारताविरुद्धच्या पहिला कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच मोठा निर्णय, मानाची स्पर्धा स्थगित

mzansi super league
---Advertisement---

लवकरच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ कसोटी मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. २६ डिसेंबर पासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून मेहनत करताना दिसून येत आहे. दरम्यान आगामी मालिकेच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिका क्रिकेटने एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ सध्या जोहान्सबर्गमध्ये आहे. पहिला कसोटी सामना सुरू जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहे. या मालिकेच्या दृष्टीने भारतीय संघ कसून सराव करत आहे. सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून पाचव्या फेरीचे सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने १६ ते १९ डिसेंबर आणि १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार होते. हे सामने पुढे ढकलण्यात आले असून हे सामने वर्षाच्या शेवटी खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघ विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर संघाचे उपकर्णधारपद केएल राहुलच्या हाती देण्यात आले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकली नाहीये. त्यामुळे यावेळी भारतीय संघ जोरदार विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक 
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)

वनडे मालिका :
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)

महत्वाच्या बातम्या :

स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर

ऍडलेड कसोटीत ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बांधले ब्लॅक आर्म बँड, कारण ऐकून कोसळेल रडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---