इंग्लंड क्रिकेट संघ नोव्हेंबर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळली जाईल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
या 24 सदस्यीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा युवा फलंदाज क्विंटन डी कॉक सांभाळणार आहे. तसेच फाफ डू प्लेसिस, डेविड मिलर, एन्रीच नॉर्किए या खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. तसेच ग्लेन्टॉन स्टर्मन या 28 वर्षीय मध्यमगती गोलंदाजाला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या संघात संधी मिळाली आहे.
त्याचवेळी आयपीएल 2020 मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या ख्रिस मॉरिसला मात्र या संघात संधी मिळाली नाही. तसेच अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहिरचीही टी20 संघात निवड झालेली नाही.
दक्षिण आफ्रिका दौर्यावर इंग्लंडचा संघ 3 वनडे आणि 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी20 मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल,तर वनडे मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होईल.
दक्षिण आफ्रिका संघ:
क्विंटन डी कॉक, तेंबा बावुमा, जूनियर डाला, फाफ डू प्लेसिस, बीजॉर्न फॉर्च्यून, ब्युरान हेंड्रिक्स, रिझा हेंड्रिक्स, हेन्रीच क्लासेन, जॉर्ज लिंड, केशव महाराज, जानेमन मलान, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रीच नॉर्किए, अँडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, ताब्राईज शम्सी, लुथो सिपम्ला, जो-जो स्मट्स, ग्लेन्टॉन स्टर्मन, पिट वॅन बिलजोन, रस्सी वॅन डर दसन, काईल व्हेरियन.
टी20 सामन्यांचे वेळापत्रक :
27 नोव्हेंबर – पहिला टी20, केप टाऊन
29 नोव्हेंबर – दुसरा टी20, पर्ल
1 डिसेंबर – तिसरा टी20, केप टाऊन
वनडे सामन्यांचे वेळापत्रक :
4 डिसेंबर -पहिला वनडे, केप टाऊन
6 डिसेंबर – दुसरा वनडे, पर्ल
9 डिसेंबर – तिसरा वनडे, केप टाऊन
महत्त्वाच्या बातम्या –
‘कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा…’ माजी कर्णधाराचा कांगारुंच्या संघाला इशारा
तुझं कौतुक करावं तेवढं कमी! रोहित शर्माच्या ‘त्या’ कृत्याला पाहून तुम्हीही असंच म्हणाल
हैदाबादविरुद्ध पराभूत होऊनही ‘मिस्टर ३६०’च्या नावावर शानदार विक्रमांची नोंद, वाचा सविस्तर
ट्रेंडिंग लेख –
ट्रेंडिंग लेख-
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!