रविचंद्रन अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्सचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये अश्विन नव्या भूमिकेत दिसत आहे. 14 जुलै रोजी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्स आणि चेपॉक सुपर यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अश्विनने आपल्या फलंदाजीत करिष्मा केला. वास्तविक, पावसाच्या येण्याने सामना 7-7 षटकांचा होता. ड्रॅगन संघाने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यातील सर्वात खास बाब म्हणजे अश्विन सालामीला फलंदाजीसाठी आला होता, अश्विनने ओपनिंग करताना स्फोटक शैलीत फलंदाजी केली.
पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ड्रॅगन्स संघाचे एकेकाळी 1 धावांवर 3 विकेट पडल्या होत्या. आश्या स्थितीतही अश्विनने आपली स्फोटक फलंदाजी सुरुच ठेवली. अश्विनने 45 धावांची खेळी खेळली ज्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. अश्विनने केवळ 20 चेंडूत 45 धावांची खेळी खेळली. अश्विनच्या खेळीच्या जोरावर ड्रॅगन्स संघाला 7 षटकांत 65 धावा करण्यात यश आले. यानंतर चेपॉक सुपर संघाने फलंदाजीला सुरुवात केली. चेपॉक सुपर संघाने 4.5 षटकांत 1 गडी गमावून लक्ष्य गाठले.
RAVI ASHWIN – CAPTAIN, LEADER, LEGEND. 🫡
– Ashwin scored 45* (20) while opening for Dindigul Dragons in a 7 overs game. The other 7 batters combined managed just 16 runs. 🤯pic.twitter.com/iCuY4JGPFu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 15, 2024
फलंदाजीच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजीत मात्र अश्विनला नशीबाची साथ मिळाली नाही असे म्हणता येईल. कारण गोलंदाजीत त्याला एकही विकेट मिळवता आले नाही. अश्विनने गोलंदाजी दरम्यान शेवटच्या 5 चेंडूत 16 धावा खर्च केल्या ज्यामुळे सामना पलटला. अश्विनने सामन्यात 1.5 षटके टाकले. ज्यामध्ये त्याने 12.54 इकाॅमनाॅमीने 23 धावा दिल्या.
अश्या परिस्थितीत भारतीय संघात कसोटीमध्ये अश्निनचे कमबॅक होणार का? हा प्रश्न समोर येत आहे. श्रीलंका दाैरऱ्यानंतर भारतीय संघ बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया 2 सामन्यांची कसोटी मालिका सप्टेंबर मध्ये खेळणार आहे. परंतु अद्याप या मालिकेला वेळ आहे. त्यामुळे गाैतम गंभीरसह बीसीसीआयला टीम निवडण्यासाठी कालावधी भरपूर कालावधी आहे.
महत्तवाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?
“दुखापतीतून ज्या पद्धतीने..”, बुमराहच्या पुनरागमनाबाबत माजी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले…
“प्रसिद्धी आणि सत्तेने विराट बदलला, तर रोहितचा स्वभाव..”, संघातील सहकारी खेळाडूनेच केले खळबळजनक विधान