क्रिकेटच्या जगात एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत. ज्यांनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट जगावर राज्य केले. त्यातले काही फलंदाज हे तंत्रशुद्ध फलंदाज होते. ते नेहमीच सावकाश आणि हवेत फटका न मारता जमिनीलगत फटका खेळायचा जास्त प्रयत्न करत असे. परंतु, क्रिकेटच्या जगात असेही फलंदाज झाले जे फलंदाजी करण्यासाठी आल्यास आपल्या खेळीमध्ये एकतरी षटकार मारल्या शिवाय त्यांची खेळी पूर्ण करत नसे. आजच्या या लेखात आपण त्यांचा विषयी माहिती करून घेणार आहोत ज्यांनी एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त षटकार खेचले आहेत.
१.शाहीद आफ्रिदी- पाकिस्तानचा ‘बूम बूम’ म्हणून प्रसिद्ध असलेला माजी खेळाडू शाहीद आफ्रिदी षटकार मारण्यात तरबेज होता. शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी संघाकडून ३९८ एकदिवसीय सामने खेळले आहे. ३६९ डावात त्याने ८०६४ धावा केल्या आहेत. या दरम्यान, शाहीद आफ्रिदीने ३५१ षटकार मारले. शाहीद आफ्रिदीने आजवर जेवढ्या धावा केल्या आहेत त्या मधून २६.१% धावा त्याने षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. क्रिकेट विश्वात एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहेत.
२.ख्रिस गेल- या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तो म्हणजे ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून जगात प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल. शाहीद आफ्रिदीनंतर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ३०१ एकदिवसीय सामन्यात १०४८० धावा केल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत गेलने आजवर ३३१ षटकार मारले आहेत. गेलने आजवर जेवढ्या धावा केल्या आहेत त्यातील १८.९ % धावा त्याने षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. ख्रिस गेल सध्या व्यावसायिक सामने जास्त खेळत असल्यामुळे त्याचे एकदिवसीय सामने खेळणे कमी झाले आहेत.
३.रोहित शर्मा- भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासुद्धा षटकार ठोकण्यात तरबेज आहे. या यादीत रोहितने तिसरे स्थान पटकावले आहे. एकदिवसीय सामन्यात रोहितने २२७ सामने खेळले आहेत. आणि त्यात रोहितने एकूण २४४ षटकार लगावले आहेत. रोहितने आजवर एकदिवसीय सामन्यात ९२०५ धावा केल्या आहेत. त्या मधून १५.९ % धावा त्याने षटकारांच्या मदतीने केल्या आहेत.
४.एबी डिविलियर्स- क्रिकेट विश्वात आपल्या आगळ्या वेगळ्या फटक्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध एबी डिविलियर्सने या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. एबी डिविलियर्स आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्त झाला आहे. परंतु, एबी डिविलियर्सने आजवर दक्षिण आफ्रिका संघासाठी २२८ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने २०४ षटकार मारले आहेत. एबी डिविलियर्सने आजवर एकदिवसीय सामन्यात ९५७७ धावा केल्या आहेत. त्यामधून १२.८% धावा त्याने षटकारांच्या मदतीने केल्या आहेत.
५.महेंद्र सिंग धोनी- भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज धोनीने या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. धोनीसुद्धा आता आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्त झाला असून धोनीने ३५० एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. धोनीने एकदिवसीय सामन्यात १०७७३ धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत धोनीने २२९ षटकार लगावले. एकूण धावांमध्ये धोनीने १२.७% धावा षटकारांच्या मदतीने केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वनाथन आनंदला हरवणारा अब्जाधीश निघाला बेईमान, संगणकाची मदत घेऊन खेळलेला सामना
सचिन म्हणतोय, कसोटी चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड; पण का? घ्या जाणून
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप