---Advertisement---

विराट-रोहितने भेट घेतलेले ‘ते’ महान क्रिकेटर नक्की आहे तरी कोण?

On: बुधवार, जून 19, 2024 10:43 AM
---Advertisement---

टीम इंडिया टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील सामन्यांपूर्वी बार्बाडोस मध्ये दाखल झाली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यांपूर्वी संघ सरावसत्रामध्ये मैदानात घाम गाळत आहे. साखळी फेरीत फ्लाॅप ठरलेले विराट कोहली नेट्स मध्ये जोमात फलंदाजाीत सराव करत आहे. 18 जून रोजी भारतीय संघाच्या सरावादरम्यान वेस्ट इंडिजचा दिग्ग्ज क्रिकेटर सर वेस्ली हॉल मैदानात पोहचले, तेथे पोहचल्यानंतर  विराट कोहली रोहित शर्माने त्यांची भेट घेतली. यावेळी सर वेस्लीनी दोघांनाही भेट म्हणून त्यांचे पुस्तक दिले.

सर वेस्ली हॉल हे वेस्ट इंडिजचे माजी महान वेगवान गोलंदाज होते. हॉलने 70 आणि 80 च्या दशकात वेस्ट इंडिजसाठी 48 कसोटी सामने खेळले आणि 192 बळी घेतले. त्यांनी 170 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 546 विकेट घेतल्या. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामन्यापूर्वी सर वेस्ली हॉल यांनी विराटला आणि कर्णधार रोहित शर्माला त्यांचे पुस्तक भेट दिले. यानंतर वेस्ली-कोहली हसताना आणि विनोद करताना दिसला. कोहलीही 86 वर्षांचा असलेल्या हॉलचे खूप लक्षपूर्वक ऐकत होता आणि त्याचे बोलणे ऐकून हसत होता.

विराट कोहली सरावदरम्यान नेट्समध्ये जोरदार फलंदाजीचा सराव करत आहे. साखळी फेरीत विरोट कोहली खास कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. त्याने 3 सामन्यांत केवळ 5 धावा केल्या आहेत. अश्या स्थितीत विराट कोहलीला सर वेस्ली यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. आता सुपर-8 मध्ये विराट कोहली चांगल्या लयी मध्ये कमबॅक करावे. अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. तर 22 जून रोजी बांग्लादेश तर सुपर-8 मधील शेवटचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना रंगणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

“हरिस, तू खंबीर राहा…आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत”; व्हायरल व्हिडिओवर शाहीन आफ्रिदीची प्रतिक्रिया
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रानं दाखवला जबरदस्त फॉर्म! जिंकलं आणखी एक सुवर्णपदक
श्रेयस अय्यरचा होणार टीम इंडियात कमबॅक! रियान पराग, अभिषेक शर्मालाही मिळू शकते संधी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---