इंग्लंडमधील बर्मिंघममध्ये २०२२ साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महिला क्रिकेट संघांचा समावेश असणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आता याबाबत वेस्टइंडीज नियामक मंडळाकडून (सीडब्ल्यूआय) आता एक नवी बातमी समोर आले आहे.
सीडब्ल्यूआइने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ साली बर्मिंघममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजच्या रूपात बार्बाडोसचा महिला क्रिकेट संघ प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा केली आहे.
सीडब्ल्यूआयद्वारा टी-२० आणि महिला सुपर ५० चषकाला स्थगिती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना सीडब्ल्यूआयने सांगितले, २०२० ची टी-२० ब्लेज स्पर्धा बार्बाडोसच्या महिला संघाने जिंकल्यामुळे, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) द्वारा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आखण्यात आलेल्या नियमानुसार, २०२२ साली होणाऱ्य स्पर्धेसाठी बार्बाडोसचा महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करेल.”
दरम्यान, वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी सीडब्ल्यूआयने एक स्थानिक महिला स्पर्धा स्थगित केल्याचे समजते.
सीडब्ल्यूआइचे कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव याबाबत बोलताना म्हणाले, “कोरोना काळ आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. ज्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव यावर्षी महिला टी-२० ब्लेज आणि महिला सुपर ५० चषक स्पर्धेला स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.”
“बर्मिंघम येथे होणाऱ्या २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी वेस्टइंडीजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बार्बाडोस महिला संघाचे आम्ही अभिनंदन करतो. तसेच त्यांना यासाठी शुभेच्छाही देतो. हा महिला संघ नक्कीच सुवर्णपदकासाठी स्पर्धा करतील. तसेच वेस्ट इंडिज संघाचे नाव उंच करतील,” असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
–‘हे क्रिकेटचे पीच आहे, तुमच्या घराचे अंगण नाही’, अँडरसनवर भडकला कर्णधार कोहली
–अँडरसनला बाउंसर टाकलेले पाहून डेल स्टेन म्हणाला, “बुमराह जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा…”
–विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित