भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखीपतमुळे एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर भारतीय संघाच्या बाहेर आहे. वास्तविक, शमीने एका युट्यूब शोमध्ये बोलताना भारतीय संघाबाबत मजेशीर गोष्टी सांगितले आहेत. शोमध्ये शमीला जेव्हा जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजाबद्दल विचारले असता. त्याच्या उत्तराने सगळ्यांना हास्यचं फुटला. तर मग जाणून घेऊया शमीच्या मते धोकादायक गोलंदाज कोण आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब शोमध्ये बोलताना शमीने काही रंजक उत्तरे दिली ज्यापैकी त्याचे एक उत्तर चाहत्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. शोध्ये शमीला विचारण्यात आले की, सध्याच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात धोकादायक गोलंदाज कोण आहे? या प्रश्नावर शमीने प्रतिक्रिया देत थेट उत्तर दिले. भारताचा दिग्गज गोलंदाज म्हणाला, मीच भारताचा दिग्गज गोलंदाज आहे. हे बोलल्यावर शमी हसायला लागला.
पुढे बोलताना शमी म्हणाला, “या क्षणी बुमराह अप्रतिम गोलंदाजी करत आहे ते देखील पहा. आपल्याकडे असलेले गोलंदाजी युनिट, ज्यामध्ये भुवी, उमेश होते. मी ही तिथे होतो आणि बुमराहही तिथे होता त्यामुळे हे गोलंदाजी युनिट अप्रतिम होते. आम्हाला खूप मजा आली. मी म्हणू शकतो, माझ्या मते भारताची ही गोलंदाजी सर्वोत्तम होती.
त्याचवेळी शमीने शोमध्ये निवृत्तीबद्दलही सांगितले आणि तो मैदानात असेपर्यंत क्रिकेट खेळतच राहणार असल्याचे सांगितले. ज्या दिवशी त्यांना वाटेल की मी तरुण खेळाडूची जागा वाया घालवत आहे, त्या दिवशी मी थँक्यू म्हणेन. शमी पुढे म्हणाला की, सध्या तो एकदम फ्रेश वाटत आहे. मी विश्वचषक विजेत्या संघाचा भाग आहे असे माझे स्वप्न आहे. मला माझ्या देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे.
शमी पुढे म्हणाला,”मला माझ्या कारकिर्दीचा शेवट भारतासाठी विश्वचषक जिंकून करायला आवडेल”. शमी टाचाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. विश्वचषक 2023 नंतर शमीने भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. आता शमी फिट होत आहे. भारतीय गोलंदाजाने सराव देखील सुरू केला आहे. शमीला आशा आहे की तो लवकरच टीम इंडियात परतेल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका मालिकेपूर्वी कोहली आणि गंभीरमधील जुने मतभेद संपले? विराटनं बीसीसीआयला स्पष्टचं सांगितले
गौतम गंभीर हेड कोच बनताच केकेआरच्या खेळाडूंची चांदी, दोघांची थेट भारतीय संघात एंट्री
आशिया चषक 2024 : भारतानं पाकिस्तानला सहज धूळ चारली, गोलंदाजांची चमकदार कामगिरी