क्रिकेट सामन्यात संघ पराभूत झाल्यानंतर आजी-माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे. मात्र, जेव्हा गतविजेता संघ पराभूत होतो, तेव्हा त्याच्या पराभवानंतर आलेल्या दिग्गज खेळाडूंच्या प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आताही असेच काहीसे झाले आहे. इंग्लंड संघाला रविवारी (दि. 15 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाविरुद्ध 69 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने मोठी प्रतिक्रिया दिली. संघ पराभूत झाला असला, तरीही त्याने मोठी भविष्यवाणी केली आहे. चला तर, सविस्तर जाणून घेऊयात…
खरं तर, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या 13व्या सामन्यता अफगाणिस्तान संघाने दिल्ली येथे इंग्लंडला 69 धावांनी नमवत मोठा उलटफेर केला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात 10 विकेट्स गमावत 284 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाचा डाव 40.3 षटकात 215 धावांवर संपुष्टात आला. यामुळे हा वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्धचा पहिला-वहिला विजय ठरला. तसेच, 2015 विश्वचषकानंतर अफगाणिस्तानचा हा एकूण दुसरा विजय ठरला.
इंग्लंडला या पराभवामुळे मोठा धक्का बसला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर बांगलादेश संघाने विजय मिळवत शानदार पुनरागमन केले होते. मात्र, त्यांना आता अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.
मायकल वॉनची प्रतिक्रिया
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने इंग्लंडच्या पराभवानंतर हैराण करणारे ट्वीट केले. तो म्हणाला की, संघ उपांत्य सामन्यात पोहोचेल. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “इंग्लंड संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचला आहे.”
England in the World Cup semis .. 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 15, 2023
खरं तर, विश्वचषकात अशाप्रकारे निराश करण्याची इंग्लंडची पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही इंग्लंड अनेकदा कमकुवत संघांविरुद्ध पराभूत झाला आहे. आता आगामी सामन्यांमध्ये इंग्लंड कशाप्रकारे पुनरागमन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यांचा पुढील सामना 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाईल. (cricket world cup 2023 michael vaughan big prediction after england defeat vs afghanistan read)
हेही वाचा-
इंग्लंडच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची नाचक्की! Points Tableमध्ये पहिल्यांदाच नेदरलँड्स अन् श्रीलंकेच्याही खाली
बलाढ्य इंग्लंडच्या नांग्या ठेचल्यानंतर अफगाणी कर्णधाराची जबरदस्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा विजय सर्वात…’