तब्बल 8 वर्षांनंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत दुसरा विजय साकारला. अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियातील 2015च्या विश्वचषकात पहिला विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. अफगाणिस्तानने बलाढ्य इंग्लंडला 69 धावांनी पराभवाची धूळ चारली. हा त्यांचा या विश्वचषकातील पहिला विजय आहे. या विजयानंतर संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी खूपच खुश झाला. त्याने विजयानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. चला तर, तो काय म्हणाला जाणून घेऊयात…
रविवारी (दि. 15 ऑक्टोबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर गतविजेत्या इंग्लंड संघाला अफगाणिस्तान संघाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या शानदार विजयामुळे अफगाणिस्तानचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजयानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने आपल्या फलंदाजांचे जोरदार कौतुक केले. ज्यांच्या जोरावर इंग्लंडपुढे 285 धावांचे आव्हान उभे करता आले. या सामन्यात अफगाणिस्तानने रहमानुल्लाह गुरबाज (80) आणि इब्राहिम जादरान (28) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली.
Afghanistan Made History by Defeating England in the ICC Men’s Cricket World Cup 🥰👏
Full report here: https://t.co/TThu8E4a8W pic.twitter.com/3NtNz5d25Q
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 15, 2023
यानंतर मधल्या फळीने खराब प्रदर्शन केले. मात्र, तळात फलंदाजी करणाऱ्या इकराम अलिखिल याने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तसेच, संघाला समाधानकारक धावसंख्या मिळवून दिली. अखेरच्या षटकात राशिद खान (23) आणि मुजीब उर रहमान (28) यांनीही मोलाचे योगदान देत संघाला 284 धावांपर्यंत पोहोचवले.
काय म्हणाला कर्णधार?
यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची फलंदाजी उद्ध्वस्त केली. राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त मोहम्मद नबीने 2, तर फजलहक फारूकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संघाच्या शानदार विजयानंतर कर्णधार शाहिदी म्हणाला की, “मी खूपच खुश आहे आणि संघाचे सर्व खेळाडूही खुश आहेत. हा आमच्यासाठी सर्वोत्तम विजय आहे. पुढील सामन्यासाठी संघात शानदार आत्मविश्वास आहे आणि मला याचा अभिमान आहे.” यावेळी त्याने सलामीवीरांच्या भागीदारीचा उल्लेख करत म्हटले की, “त्यांना खूप श्रेय जाते. दुर्दैवाने, आज आम्ही पुन्हा नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. आम्हाला याचा विचार करावा लागेल. आम्ही चांगली सुरुवात केली आणि याचे श्रेय गुरबाजला जाते.”
पुढील आव्हान कुणाचे?
अफगाणिस्तान संघाला पुढील सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (eng vs afg this is just the first win looking for more in the tournament says afghanistan captain Hashmatullah Shahidi)
हेही वाचा-
पराभवानंतर खचला बटलर, आपल्या सोडून अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे गायले गुणगान; म्हणाला, ‘दु:ख झालंच पाहिजे…’
ऑस्ट्रेलिया की श्रीलंका? कोण खोलणार विश्वचषकात विजयाचे खाते