भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत, जे विरोधी संघाच्या गोलंदाजीची पिसे काढण्याची क्षमता बाळगतात. मात्र, संधी मिळूनही अनेकदा त्यांना तोंडघशी पडावे लागते. अशात, त्यांच्या संघात परतण्याची शक्यताही कमी होते. असेच काहीसे सध्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्याबाबत घडताना दिसत आहे. अशात भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने संजूविषयी मोठे भाष्य केले आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने संजू सॅमसन (Sanju Samson) याच्याविषयी म्हटले की, त्याला अनेक संधी मिळाल्या, परंतु त्याला याचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे तो संघाबाहेर आहे. यावेळी चोप्राने चाहत्यांचाही समाचार घेतला. तो म्हणाला, लोक म्हणतात, संजू सॅमसन भारतीय क्रिकेटला मिळालेला देवाची एक भेट आहे, परंतु खरं तर त्याच्या बॅटमधून खास कामगिरी होताना पाहायला मिळत नाही.
युट्यूबवर एका कार्यक्रमात बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “भारतीय क्रिकेटजगत खूपच रंजक आहे. तुम्हाला हे आवडू वा न आवडू, परंतु येथील माहौल दृष्टिकोन बदलतो. हे अनेकदा सत्यतेपेक्षाही जास्त मजबूत असते. संजू सॅमसन याचे अधिकतर चाहते एका विशेष भागातून येतात. आपण एक डिजिटल जगात राहत आहोत आणि संजू जिथून येतो, त्या भागात डिजिटलचा वापर चांगला आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा संजू खेळतो, तेव्हा तो फलंदाजी खूपच सोपी बनवताना दिसतो. त्याला पाहून डोळ्यांनाही चांगले वाटते. तो त्याच्या संघाला रणजीच्या फायनलपर्यंत घेऊन गेला, आयपीएल फायनलमध्येही घेऊन गेला. त्याला भारतीय संघातही संधी मिळाली, परंतु इथे त्याला खास काही करता आले नाही. हीच वास्तविकता आहे, जी त्याचे चाहते समजू शकत नाहीयेत. संजूला हे माहितीये की, सध्या भारतीय संघातील जे सेटअप आहे, त्यात त्याच्यासाठी मर्यादित संधीच उपलब्ध आहेत.”
‘संजू सॅमसनच्या फलंदाजीत काहीच फरक पडत नाही’
संजूबद्दल बोलताना आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “लोकांनी म्हटले की, संजू भारतीय क्रिकेटला मिळालेली देवाची भेट आहे. त्याला खेळवा आणि सर्व ठीक होईल. इतकेच नाही, तर आपण विश्वचषकही जिंकलो असतो, परंतु त्याच्या बॅटमध्ये काहीच फरक पडत नाही. फक्त माहौल बनवला जातो की, संजूला खेळवले असते, तर असे होते- तसे होते.”
आयपीएलमध्ये दिसणार संजू सॅमसन
या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून आयपीएल 2023ला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत संजू राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. खरं तर, राजस्थानने आयपीएलचे पहिला-वहिला किताब जिंकला होता. मात्र, त्यानंतर राजस्थानच्या नशिबात दुसरी ट्रॉफी आलीच नाही. अशात आगामी हंगामात संजू संघाला दुसरे किताब जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. संजूने 138 आयपीएल सामन्यात 29.14च्या सरासरीने 3526 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 17 अर्धशतकेही झळकावली आहेत. 119 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (cricketer aakash chopra on sanju samson and his fans over team india selection)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमदाबादमध्ये अश्विनने एक नाही, तर नावावर केले हे तीन मोठे विक्रम, ऑस्ट्रेलियाची मोठी आघाडी
ख्वाजा-ग्रीनच्या शतकी धमाक्यानंतर शेपटाचा टीम इंडियाला तडाखा, 480 च्या प्रत्युत्तरात टीम इंडिया बिनबाद 36