क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात प्रत्येक दिवशी, प्रत्येक मालिका-सामन्यात काही ना काही नवीन घडतंच घडतं. सध्या ज्या वेगाने जगभरात क्रिकेट खेळ खेळला जात आहे, ते पाहता नवीन गोष्टी घडणे साहजिक आहे. मात्र, शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) रात्री क्रिकेट चाहत्यांना असे काही पाहाला मिळाले, जे त्यांना क्रिकेट मैदानावर पाहायला आवडणार नाही. खरं तर, अबू धाबी टी10 लीग स्पर्धेदरम्यान भारतीय गोलंदाज अभिमन्यू मिथुन नो बॉल टाकल्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने टाकलेला नो बॉल पाहून चाहत्यांना 2010मध्ये मोहम्मद आमिर याने केलेले कांड आठवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा परसत असून अभिमन्य मिथुनवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावले जात आहेत.
ही घटना शनिवारी खेळल्या गेलेल्या द चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स (The Chennai Braves vs Northern Warriors) सामन्यातील आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सने हजरतुल्लाह जजईच्या अर्धशतकाच्या जोरावर 10 षटकात 3 विकेट्स गमावत 106 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाच्या डावातील पाचवे षटक अभिमन्यू मिथुन (Abhimanyu Mithun) टाकत होता. त्याने यावेळी तिसरा चेंडू नो बॉल टाकत सर्वांना हैराण केले. भारतीय गोलंदाजाचा एवढा मोठा नो बॉल पाहून खेळाडूंसह समालोचक आणि चाहतेही दंग झाले होते.
एकाने असेही लिहिले की, “अबू धाबी टी10 लीगमधील नो बॉल. गोलंदाज- अभिमन्यू मिथुन. टी10 लीग फिक्स असू शकते.”
A no ball with barest margin in Abu Dhabi T-10 league ????
Bowler : Abhimanyu Mithun
T10 league could well be fixed pic.twitter.com/zir7Z6E1Oj— Sports Production (@SportsProd37) December 2, 2023
दुसऱ्या एकाने असेही लिहिले की, “अभिमन्यू मिथुनकडून आमिर मोमेंट. एकेकाळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचा दिग्गज असलेल्या अभिमन्यू मिथुनसारख्या खेळाडूने असे केल्याचे पाहून वाईट वाटले.”
Amir moment by Abhimanyu Mithun ????
Disappointed to see this from someone like Abhimanyu Mithun who was once a domestic stalwart for Karnataka!
#AbuDhabiT10 #NoBall pic.twitter.com/RRFXxGjAnr
— Sann (@san_x_m) December 2, 2023
???? AMIR MOMENT BY ABHIMANYU MITHUN IN ABU DHABI T10 #AbuDhabiT10 pic.twitter.com/Tau9o1iz4T
— UMAIR ???????? ???????? (@alooparanthah) December 2, 2023
Abhimanyu Mithun with probably the biggest No-Ball.
Very Mohammad Amir-like.
Maybe…. https://t.co/lsjWFZpJeF
— Sumit Sundriyal ???????? (@SumitSun14) December 2, 2023
काही वेळानंतर यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. तसेच, अभिमन्यू मिथुनवर मॅच फिक्सिंगचा आरोप लागण्यास सुरुवात झाली. मिथुनने टाकलेल्या चेंडूमुळे चाहत्यांना मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याची आठवण आली. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने 2010मध्ये सहकारी खेळाडूसोबत मिळून क्रिकेटवर असाच काहीसा डाग लावला होता.
सचिन-धोनीसोबत केलीय ड्रेसिंग रूम शेअर
अभिमन्यू मिथन याची कारकीर्द पाहिली, तर त्याने भारतीय संघाकडून 4 कसोटी आणि 5 वनडे सामने खेळले आहेत. माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली या गोलंदाजाला 2010मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांसारख्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. मिथुनने 4 कसोटीत 9 आणि 5 वनडेत 3 विकेट्स नावावर केल्या होत्या. (cricketer abhimanyu mithun no ball creates havoc in abu dhabi t10 league 2023 allegations of match fixing are being raised)
हेही वाचा-
दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी! पंड्या नसला तरीही गुजरात खेळणार IPL 2024ची फायनल, म्हणाला, ‘फसवलं…’
ठरलं रे! IPL 2024 Auctionची तारीख आणि ठिकाणाची अधिकृत घोषणा; पहिल्यांदाच भारताबाहेर खेळाडूंवर लागणार बोली