भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा जेव्हा आपण फलंदाजांबद्दल बोलतो तेव्हा क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि चाहत्यांचा लाडका विराट कोहली यांचे नाव अग्रस्थानी येते. या दोघांनी विश्वचषक क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाविरुद्ध भरपूर धावा केल्या आहेत, ज्यासाठी ते भारताचे महान फलंदाज मानले जातात. मात्र, पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जुनैद खान यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्या दृष्टीने सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली हे भारताचे महान फलंदाज नाहीत. तर, त्याच्या नजरेत भारताचा महान फलंदाज हा रोहित शर्मा आहे.
अनेक दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट संघातून बाहेर असलेला जुनैद खान (Junaid Khan) नुकताच नादिर अली याच्या पॉडकास्टवर दिसला. त्यामध्ये त्याला विचारण्यात आले की, भारताचा महान फलंदाज कोण, सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) की विराट कोहली?(Virat Kohli) या प्रश्नाचे उत्तर देताना जुनैद खान म्हणाला, “मला रोहितचे नाव घ्यायचे आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. म्हणूनच त्याला हिटमॅन म्हटले जाते. एकदिवसीय सामन्यात 264 धावा करणे आणि त्यानंतर 2-3 वेळा वनडेमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणे ही सामान्य गोष्ट नाही.”
जुनैद पुढे बोलताना म्हणाला की, “एखाद्या खेळाडूला द्विशतक हे एकदाच होत असते पण त्याने पुन्हा पुन्हा केली आहेत. या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. त्याने सर्वाधिक षटकारही मारले आहेत. त्यामुळे माझे मत रोहितला आहे.”
https://twitter.com/SelflessCricket/status/1730765495148683639?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1730765495148683639%7Ctwgr%5Ea98b2149de10c93b9505508cc4333484415354ea%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-junaid-khan-pick-rohit-sharma-greatest-of-all-time-indian-batsman
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकात संघाचे नेतृत्व करताना त्याने आपल्या बॅटने 597 धावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. विजेतेपदाच्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी रोहितने भारतीय संघाचे नेतृत्व ज्या प्रकारे केले त्याने सर्वजनच त्याचे चाहते बनले आहेत. (Neither Sachin nor Virat According to a Pakistani bowler, this is India’s greatest batsman)
महत्वाच्या बातम्या
द्रविडची नाळ मातीशी जोडलेली! पत्नीसोबत पायऱ्यांवर बसून पाहिला लेकाचा क्रिकेट सामना, फोटो जोरात व्हायरल
IND vs AUS T20: मालिकेतील पाचवा सामना कधी आणि कुठे पार पडणार? वाचा सर्वकाही