---Advertisement---

तोटा झाला रे! आयपीएल 2023च्या लिलावात रहाणेला 50 लाखांचा फटका, चेन्नईने घेतलं फक्त ‘एवढ्या’ लाखात

On: शुक्रवार, डिसेंबर 23, 2022 3:22 PM
Ajinkya-Rahane
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे आयपीएल 2023च्या मिनी लिलाव पार पडला. या लिलावात काही खेळाडूंवर चांगली बोली लागली, तर काहींची निराशा झाली. यापैकीच एक खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे. रहाणे याला चार वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासारख्या जबरदस्त खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी कोणत्याच फ्रँचायझीने रस दाखवला नाही. मात्र, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने रहाणेवर विश्वास ठेवत त्याला 50 लाखांच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात सामील केले. विशेष म्हणजे, मागील हंगामात रहाणेला कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने 1 कोटींच्या किंमतीत आपल्या गोठात घेतले होते. मात्र, यावेळी त्याला 50 लाख रुपयांचा तोटा झाला.

अजिंक्य रहाणे आयपीएल कारकीर्द
अजिंक्य रहाणे याने एकूण 158 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 30.86च्या सरासरीने आणि 120.68च्या स्ट्राईक रेटने 4074 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 28 अर्धशतकेही ठोकली आहेत. नाबाद 105 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम खेळी आहे. (cricketer Ajinkya Rahane goes to CSK for INR 50 Lakh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! दीड कोटींचा नवखा इंग्लिशमन 13.25 कोटीत हैदराबादच्या चमूत; वाचा कोण आहे तो
गतविजेत्या गुजरात टायटन्सची पहिली खरेदी, विलियम्सनला ताफ्यात घेण्यासाठी खर्च केले ‘एवढे’ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---