रातोरात स्टार होणारे क्रिकेटपटू खूप कमी असतात, त्यापैकीच एक म्हणजे आकाश मधवाल होय. आयपीएल 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात आकाशने घातक गोलंदाजी करत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या जोरावर मुंबईने सामना 81 धावांनी आपल्या नावावर केला. यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. अशात आता त्याच्याविषयी भाऊ आशिष मधवाल याने मोठा खुलासा केला आहे.
आशिष मधवाल (Ashish Madhwal) याने खुलासा करत म्हटले की, आकाश मधवाल (Akash Madhwal) याच्या गोलंदाजीची इतकी भीती होती की, त्याच्यावर स्थानिक स्पर्धांमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती. त्याच्या चेंडूचा सामना कुणालाही करायचा नव्हता.
‘लोकांमध्ये आकाशच्या गोलंदाजीची भीती’
माध्यमांशी बोलताना आशिषने सांगितले की, कशाप्रकारे लोक त्याच्या गोलंदाजीवर खेळण्यास घाबरत होते. त्यामुळे त्याला गोलंदाजी करू दिली जात नव्हती. तो म्हणाला की, “कोणीही आकाशला इथे खेळू देत नव्हते. त्याच्या गोलंदाजीची सर्वात जास्त भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे त्याला स्थानिक स्पर्धांमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखले जायचे. एक भीतीचे वातावरण खेळाडूंमध्ये होते. आकाश रुडकीच्या बाहेर जाऊन खेळायचा. मात्र, आता त्याच्या टेनिस चेंडूने खेळण्याचे दिवस गेले आहेत. तो सध्या खूपच खुश आहे. कर्णधार रोहित शर्मा त्याचे अर्धी चिंता स्वत: घेतो. त्यांच्यात चांगला बाँड आहे.”
यापूर्वीही आकाश मधवाल याने लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी म्हटले होते की, “मी 2018पासून या संधीची वाट पाहत होतो. जेव्हा आम्ही नेटमध्ये सराव करायचो, तेव्हा संघ व्यवस्थापन आमच्यावर लक्ष द्यायचे आणि आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचो.”
आकाशची शानदार गोलंदाजी
आकाश मधवाल याने लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 3.3 षटके गोलंदाजी करताना फक्त 5 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. आयपीएल इतिहासात कोणत्याही अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू) खेळाडूने अशी कामगिरी करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता त्याच्यावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. (cricketer akash madhwal was banned from local tournaments reveals his brother)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी तर म्हणेल त्याची संघात…’, टी20 विश्वचषकातील विराटच्या संघातील स्थानाविषयी स्पष्टच बोलले गावसकर
IPL संपल्यानंतर अफगाणिस्तानला जाता जाता गंभीरविषयी ‘हे’ काय बोलून गेला नवीन, एक नजर टाकाच