आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी (24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ समोरासमोर आले. मुंबईने या सामन्यात लखनऊ संघाला अक्षरशः नामोहरम करत 81 धावांनी दणदणीत विजय साकारला. या पराभवासह लखनऊ सलग दुसऱ्या वर्षी एलिमिनेटरच्या पुढे जाऊ शकला नाही. या पराभवानंतर लखनऊ संघाचे संघमालक व सीईओ संजीव गोयंका हे चांगलेच संतापलेले दिसले.
आपला केवळ दुसराच हंगाम खेळत असलेल्या लखनऊ संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत दुसऱ्या वर्षीही प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. मागील वर्षी त्यांना आरसीबीने पराभूत केले होते. तर यावेळी मुंबईने त्यांच्यावर एकतर्फी मात केली. या पराभवानंतर संघाचे संघमालक संजीव गोयंका हे कमालीचे संतापलेले दिसत होते.
https://twitter.com/ChokshiYash/status/1661449269826715648?t=4smtZKJMUnSz4eJaRTSx5A&s=19
एलिमिनेटर सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये गोयंका व संघाचा मेंटर गौतम गंभीर यांच्यामध्ये चर्चा होताना दिसतेय. त्यावेळी गोयंका यांचे हावभाव रागावले असल्याचे दिसून येत आहेत. तसेच, यावेळी गंभीर त्यांना समजावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
गोयंका हे मोठे क्रीडाप्रेमी मानले जातात. लखनऊ सुपरजायंट्स व्यतिरिक्त मोहन बागान सुपरजायंट्स या प्रतिष्ठेच्या फुटबॉल क्लबची मालकी देखील त्यांच्याकडे आहे. तसेच यापूर्वी आयपीएलमध्ये त्यांनी दोन वर्षासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स हा संघ देखील विकत घेतलेला. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी ते अनेकदा मैदानामध्ये दिसून येतात.
या हंगामातील लखनऊ संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास, केएल राहुलच्या नेतृत्वात संघाने चांगली सुरुवात केली होती. मात्र, राहुल बाहेर झाल्यानंतर त्यांना काही पराभव पत्करावे लागले. असे असतानाही कृणाल पांड्या याच्या नेतृत्वात संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता.
(Lucknow Supergiants Owner Sanjeev Goenka Angry After Team Loss In IPL 2023 Eliminator Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईसीबीच्या करारातून मुक्त होणार इंग्लंडचा दिग्गज फलंदाज? लीग क्रिकेट खेळण्यासाठी 30 कोटींची ऑफर