अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेल याने कहर केला आहे. मंगळवारी (दि. 18 जुलै) पार पडलेल्या एका सामन्यात त्याने जबरदस्त खेळी साकारली. या डावादरम्यान त्याने 4 जबरदस्त षटकार मारले. यातील एक षटकार 100मीटरहून अधिक लांब गेला. आता त्याचा व्हिडिओही सर्वत्र व्हायरल होत आहे.
रसेलचा गगनचुंबी षटकार
मंगळवारी एमएलसी 2023 (MLC 2023) स्पर्धेतील 8वा सामना लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न (Los Angeles Knight Riders vs San Francisco Unicorns) संघात खेळला गेला. या सामन्यात नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याने शानदार प्रदर्शन केले. त्याने 26 चेंडूत 161.54च्या स्ट्राईक रेटने 42 धावा कुटल्या. यामध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांचाही समावेश होता.
रसेलच्या गगनचुंबी षटकारांनी चांगलीच मैफील तर लुटली. 19वे षटक टाकत असलेल्या हॅरिस रौफ (Haris Rauf) याच्या पहिल्याच चेंडूवर आंद्रे रसेल 108 मीटर लांबीचा षटकार (Andre Russell 108 Meter Six) मारण्यात यशस्वी झाला. हा षटकार स्पर्धेतील सर्वात लांब षटकार आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Andre Russell madness in the MLC!!
A 108M monstrous six. pic.twitter.com/Et6a6Z0LF6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 19, 2023
युनिकॉर्न संघाचा विजय
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर रसेलने वादळी फलंदाजी करूनही संघाला विजय मिळाला नाही. या सामन्यात युनिकॉर्न संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी संघाने मॅथ्यू वेड याच्या 78 धावांच्या जोरावर 213 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना लॉस एंजेलिस संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही.
निर्धारित 20 षटकात सुनील नारायण (Sunil Narine) याच्या संघाने 5 विकेट्स गमावत 191 धावा केल्या. यावेळी नाईट रायडर्सच्या त्यामुळे हा सामना युनिकॉर्न संघाने 21 धावांनी जिंकला. या सामन्यात रायडर्सकडून जेसन रॉय याने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली.
स्पर्धेतील पुढील सामना वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात नाईट रायडर्स संघ विजय मिळवतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer andre russell smashed 108 meter six to haris rauf in major cricket league)
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटी दिवस बदललेच! युवा स्टार जयसवालने ठाण्यात घेतलं 5 BHKचं नवीन घर, आधी राहायचा भाड्याच्या घरात
नव्या दमाच्या यशस्वीला ‘दादा’चा फुल सपोर्ट; विश्वचषकाविषयी म्हणाला, ‘मला त्याला…’