श्रीलंका देश सध्या मोठ्या आर्थिक संकटातून (Sri Lanka Crisis) जात आहे. भारतात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल खेळण्यात व्यस्त असलेल्या कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि भानुका राजपक्षे हे दिग्गज श्रीलंकन क्रिकेटपटू आपल्या देशाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. यादरम्यान श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि मंत्री अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) यांनी मंगळवारी (१२ एप्रिल) सध्या आयपीएल खेळत असलेल्या सर्व श्रीलंकन खेळाडूंना मायदेशात परतत देशाच्या पाठीशी उभे राहण्याचे आव्हान केले आहे.
एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना रणतुंगा (Arjuna Ranatunga Urges Sri Lankan Players) म्हणाले की, “वास्तव मला माहिती नाही. परंतु काही असे क्रिकेटपटू आहेत, जे आयपीएलमध्ये शानदार खेळ दाखवत आहे. मात्र ते आपल्या देशाबद्दल व्यक्त होत नाहीयेत. खरे तर त्यांनी अशा परिस्थितीत मायदेशी परत यायला हवे आणि आपल्या जन्मभूमीच्या समर्थनार्थ उभे व्हायला पाहिजे.”
“दुर्भाग्य असे की, लोक सरकारविरुद्ध बोलायला घाबरतात. काही क्रिकेटपटू मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्रिकेट बोर्डासाठी काम करत आहेत आणि ते त्यांची नोकरी वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु आता त्यांना एक पाऊल पुढे ठेवण्याची गरज आहे. कारण काही युवा क्रिकेटपटूंनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी सरकारविरोधी वक्तव्येही केली आहेत. जेव्हा काही चुकीचे होत असते, तेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल विचार न करता त्याविरुद्ध बोलण्यासाठी पुढाकार घेण्याची हिंमत तुमच्यामध्ये असायला पाहिजे,” असे ते पुढे म्हणाले.
आयपीएलमध्ये खेळतायत बरेच श्रीलंकन खेळाडू
दरम्यान आयपीएल २०२२ मध्ये वानिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), भानुका राजपक्षे (पंजाब किंग्ज), दुष्मंथा चमीरा(लखनऊ सुपरजायंट्स), महिश तिक्ष्णा (चेन्नई सुपर किंग्ज) आणि चामिका करुणारत्ने (कोलकाता नाईट रायडर्स) हे श्रीलंकेचे खेळाडू सहभागी आहेत. तसेच लसिथ मलिंगा आणि माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. तर श्रीलंकन दिग्गज कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाच्या रूपात आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022 | मुंबई, पुणे नव्हे तर ‘या’ ठिकाणी रंगणार प्लेऑफ सामने, फायनल अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता
हार्दिकच्या डोक्यावर लागला खतरनाक बाऊंसर, पाहून पत्नी नताशा आली टेंशनमध्ये; Video व्हायरल
Video: अभिनव मनोहरवर हैदराबादच्या खेळाडूंची कृपा, चक्क ३ कॅच सोडल्यानंतर फलंदाजालाही फुटलं हसू