Asghar Afghan on MS Dhoni: जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये भारताचा माजी दिग्गज एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी नावावर केल्या आहेत. धोनीविषयी अनेकदा आजी-माजी खेळाडू वेगवेगळे किस्से शेअर करत असतात. अशात धोनीविषयी अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगान याने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
धोनीचा मजेशीर अंदाज
अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगाण (Asghar Afghan) याने भारताविरुद्ध आशिया चषक 2018 (Asia Cup 2018) स्पर्धेतील बरोबरीत सुटलेल्या एका सामन्यातील एमएस धोनी याच्या एक किस्सा शेअर केला. त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सामन्यानंतर धोनीशी झालेल्या चर्चेची आठवण काढली. तो म्हणाला, त्याने धोनीला म्हटले होते की, मोहम्मद शहजाद त्याचा मोठा चाहता आहे. धोनीने फिरकी घेत म्हटले की, जर शहजादचे वजन 20 किलो कमी झाले, तर तो त्याला आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून घेईल.
धोनीचे कौतुक
अफगानने म्हटले की, “सामना बरोबरीत सुटल्यानंतर मी एमएस धोनीशी चर्चा केली. तो एक शानदार कर्णधार आहे आणि भारतीय क्रिकेटसाठी देवाची भेट आहे. तो एक चांगला व्यक्तीही आहे.” पुढे बोलताना त्याने म्हटले की, “आम्ही शहजादविषयी खूप चर्चा केली.”
काय होता किस्सा?
“मी धोनीला भाईला म्हणालो की, शहजाद तुमचा खूप मोठा चाहता आहे. धोनी हसत म्हणाला की, शहजादचे पोट खूप मोठे आहे आणि जर त्याने 20 किलो वजन कमी केले, तर मी त्याला आयपीएलमध्ये निवडेल. यानंतर शहजाद मालिकेनंतर अफगाणिस्तानला परतला, तेव्हा त्याचे वजन आणखी 5 किलो वाढले.”
अफगानसाठी भारतासोबतचा सर्वात चांगला सामना होता
भारतासोबतचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर अफगाणिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला की, “2018चा भारताविरुद्धचा सामना बरोबरीत सुटलेला सामना माझ्यासाठी सर्वात चांगला क्षण होता. तो एक चांगला सामना होता.”
बरोबरीत सुटलेला भारत-अफगाणिस्तान सामना
शहजादला दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया चषक 2018 स्पर्धेत भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या सामन्यात शहजादने 116 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 124 धावा केल्या होत्या. यामुळे अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 252 धावा केल्या होत्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ 49.5 षटकात 252 धावांवर सर्वबाद झाला होता. (cricketer asghar afghan remember hilarious moment with ms dhoni of 2018 tied match asia cup)
हेही वाचा-
‘कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाला धोका…’, श्रीलंकेन दिग्गजाच्या विधानाने वेधले क्रिकेटप्रेमींचे लक्ष, वाचा
‘हा संघ वनडेपेक्षा टी20त चांगला…’, बलाढ्य संघाच्या स्टार खेळाडूचे T20 World Cup 2024पूर्वी मोठे विधान