अनेकदा आपण संघात निवड न झाल्यास क्रिकेपटूंना निराश होताना पाहिले आहे. अनेकदा खेळाडू त्यांची नाराजी उघडपणे जाहिर करतानाही दिसतात. मात्र, एखाद्या खेळाडूने संघात निवड न झाल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलं उचलणे हे अगदी तुरळक वेळेस पाहायला मिळते. ही घटना घडली आहे पाकिस्तानाचील दक्षिण सिंध प्रांतात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) आंतरराज्य चॅम्पियनशिपसाठी घरच्या संघात निवड न झाल्याने दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादमधील एका तरुण क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज शोएबने स्वत:चे मनगट कापले आणि कुटुंबीयांनी त्याला मंगळवारी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेले. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, चॅम्पियनशिपच्या चाचण्यांनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही, त्यानंतर नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले.
कुटुंबातील सदस्याने सांगितले की, “आम्हाला तो आमच्या खोलीच्या बाथरूममध्ये सापडला आणि त्याचे मनगट कापले गेले. तो बेशुद्ध पडला होता आणि आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे.” त्यामुळे सध्या त्याच्या प्रकृतीसाठी सगळीकडून प्रार्थना करत आहेत.
दरम्यान यापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्ये, कराचीचा १९ वर्षांखालील क्रिकेटपटू मोहम्मद जरयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोहित शर्मा ‘नॉर्मल बॉलर’ म्हंटलेला, आता सहा वर्षांनी पाकिस्तानी गोलंदाजाचे प्रत्युत्तर
नेदरलँडचा मायकल ‘हा’ खेळाडू स्वतःच्याच संघाविरुद्ध करणार न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व, वाचा सविस्तर
संजू सॅमसनने ‘या’ चुका केल्या नाहीतर तो संघात टिकेल, भारताच्या दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला