जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांनी टी20 लीग सुरू केली आहे. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचाही समावेश आहे. पीएसएल स्पर्धेच्या 8व्या हंगामाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 मार्च रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील 12वा सामना गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) कराची येथे पार पडला. हा सामना पेशावर जालमी विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड संघात खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान भुवया उंचावणारा घटना घडली. पेशावर जालमी संघाचा कर्णधार बाबर आझम हा गोलंदाजाच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मात्र, पेशावर संघाच्या डावादरम्यान बाबर आझम (Babar Azam Video) याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो इस्लामाबाद संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) याच्यामागे बॅट घेऊन धावला.
क्रिकेट पाकिस्तानने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बाबर गोलंदाजाच्या दिशेने बॅट घेऊन त्याला मारण्याच्या अंदाजात येतो, पण तो जवळ येण्यापूर्वीच गोलंदाज हसन अली तिथून बाजूला सरकतो. मात्र, हा व्हिडिओ मजेशीर असून सोशल मीडिया युजर्सच्याही पसंतीस पडताना दिसत आहे.
Some banter between Babar Azam and Hassan Ali#PZvsIUpic.twitter.com/tDsxIhcrCl
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) February 23, 2023
सामन्याचा आढावा
कराची येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पेशावर जालमी (Peshawar Zalmi) संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 156 धावा केल्या होत्या. यामध्ये बाबर आझम (Babar Azam) याने सर्वाधिक नाबाद 75 धावा कुटल्या. या धावा त्याने 58 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर मोहम्मद हॅरिस यानेही 21 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. त्याने यादरम्यान 1 षटकार आणि 4 चौकारही मारले होते. मात्र, इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.
पेशावर संघाचे 157 धावांचे आव्हान इस्लामाबाद संघाने 14.5 षटकात 4 विकेट्स गमावत आणि 159 धावा चोपत पूर्ण केले. तसेच, हा सामना 6 विकेट्सने खिशात घातला. (cricketer babar azam ran to hit the bowler hasan ali in psl match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलवर जोरदार टीका होत असतानाच मिळाला विंडीजच्या दिग्गजांचा भक्कम पाठिंबा; म्हणाले, ‘एक हजार पटीने…’
आधीच खराब फॉर्म, त्यात दुखापतीमुळे दौऱ्यातूनही बाहेर; वॉर्नरने इंस्टावर मनातलं सगळंच दु:ख टाकलं सांगून