जगभरातील सर्वात प्रतिष्ठित टी20 लीगपैकी एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएल होय. आयपीएलच्या 16व्या हंगामाचा मिनी लिलाव येत्या 23 डिसेंबर रोजी होणार आहे. आयपीएल लिलावासाठी एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. यामध्ये 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर त्यात मयंक अगरवाल, मनीष पांडे, केदार जाधव यांच्यासारख्या खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. मात्र, भारतीय संघाचा भाग असलेले दोन खेळाडू असे आहेत, ज्यांनी आयपीएल लिलावात आपले नाव नोंदवले नाही.
हाती आलेल्या वृत्तानुसार, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांनी आयपीएल 2023च्या मिनी लिलावात (IPL 2023 Mini Auction) आपले नाव नोंदवले नाहीये. पुजाराला चेन्नई सुपर किंग्स संघाने 2021मध्ये त्याच्या मूळ किंमतीत 50 लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. मात्र, त्याला खेळण्याची संधी दिली नव्हती.
Pujara and Vihari are not part of the IPL 2023 mini-auction.
— Johns. (@CricCrazyJohns) December 6, 2022
पुजारा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स संघांकडून खेळला आहे. मात्र, त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने शेवटचे आयपीएल सामने 8 वर्षांपूर्वी 2014मध्ये खेळले होते. 34 वर्षीय पुजाराने आतापर्यंत 30 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 390 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 2022च्या ऑक्शनमध्ये पुजाराला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात सामील केले नव्हते.
दुसरीकडे, हनुमा विहारीबद्दल बोलायचं झालं, तर तो सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. त्याने 24 आयपीएल सामन्यात फलंदाजी केली आहे. त्यात त्याने 284 धावा केल्या आहेत. त्याने त्याचा शेवटचा आयपीएल सामना 2019मध्ये खेळला होता. सन 2022च्या लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती.
खरं तर, सर्वच्या सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 163 खेळाडूंना रिटेन केले होते. तसेच, 85 खेळाडूंना संघांनी रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लिलावात 30 परदेशी खेळाडूंसोबतच 87 खेळाडूंचीच निवड होऊ शकते. (cricketer cheteshwar pujara and hanuma vihari are not part of the ipl 2023 mini auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चित्तथरारक! कैफने 10 हजार फुटांच्या उंचीवरून मारली डाईव्ह, पाहून तुमचेही फिरतील डोळे
व्हिडिओ: एकीकडे सानियाशी घटस्फोटाच्या बातम्या, तर दुसरीकडे शोएब मुलासोबत लॅम्बोर्गिनीत मारतोय फेरफटका