मागील काही दिवसांपासून पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक भलताच चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाल्याच्या अफवा जोरदार रंगल्या आहेत. पाकिस्तानचा हा खेळाडू आता लंका प्रीमिअर लीग 2022मध्ये खेळताना दिसणार आहे. तो जाफना किंग्स संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी शोएब मलिक मुलगा इजहान मिर्झा मलिक याला आपल्या नारंगी रंगाच्या लॅम्बोर्गिनी गाडीत फेरफटका मारण्यासाठी बाहेर घेऊन गेला. यादरम्यान सानिया त्यांच्यासोबत दिसली नाही. मलिकचा यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
शोएब मलिकने शेअर केला व्हिडिओ
क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले आहे की, “लंका प्रीमिअर लीगसाठी उड्डाण घेण्यापूर्वी बापलेकाचा क्वालिटी टाईम आणि लाँग ड्राईव्ह. तसंही ड्राईव्हदरम्यान आमचे बेल्ट होते. खात्री करा की, तुम्हीही तुमचा सीट बेल्ट बांधला आहे.”
मात्र, सानियाने शोएबच्या या पोस्टला लाईक किंवा कमेंट केली नाही. मागील काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. या दोघांपैकी कुणीही यावर अधिकृत वक्तव्य केले नाहीये.
सानिया महिला डबल्समध्ये माजी अव्वल क्रमांकाची खेळाडू होती. तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम एकेरी रँकिंग ही 27 होती. तिने तिच्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियन ओपन, विंबल्डन आणि यूएस ओपन महिला डबल्स तसेच मिश्र डबल्सचा किताब जिंकला आहे. तसेच, तिने फ्रेंच ओपनमध्येही मिश्र डबल्सचा किताब आपल्या नावावर केला आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरसोबत मलिकच्या कथित अफेअरनंतर सानिया आणि क्रिकेटरच्या अफवा सर्वत्र आगीसारख्या पसरल्या. कथित घटस्फोटांच्या चर्चांमध्ये एका ओटीटी प्लॅटफॉर्मने नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर घोषणा केली की, सानिया आणि शोएब त्यांच्या ‘द मिर्झा मलिक शो’मध्ये एकत्र येत आहेत.
मलिकची कारकीर्द
पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिक याने 35 कसोटी, 287 वनडे सामने आणि 124 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 1898 धावा, वनडेत 7534 धावा आणि टी20त 2435 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 12 शतके झळकावली आहेत. (cricketer shoaib malik takes son izhaan on drive in lamborghini amid divorce rumour with sania mirza see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियात मोठी घडामोड! ‘या’ माजी खेळाडूच्या खांद्यावर महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी
‘ही तर चीटिंग’, पाकिस्तान- इंग्लंड सामन्यातील टीव्ही पंचांच्या ‘त्या’ निर्णयाने वादाला फुटले तोंड