---Advertisement---

घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, म्हणाली, ‘मनावर दडपण…’

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 3:44 PM
---Advertisement---

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्पोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मागच्या काही आठवड्यांमध्ये या दोघांविषयी वेगवेगळ्या बातम्या चाहत्यांना पाहायला मिळाल्या आहेत. घटस्फोटाच्या बातम्या काही दिवसांपासून शांत होतच होत्या, तितक्यात सानियाने एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. चाहते सानियाच्या या पोस्टकडे दोघांच्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने पाहत आहेत. 

सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि सोएब मलिक (Shoain Malik) मागच्या 12 वर्षांपासून एकत्र आहेत. पण एवढा मोठा काळ एकत्र संसार केल्यानंतर दोघे वेगळे होणार असल्याचे सध्या समोर येत आहे. या दोघांनी जर घटस्फोट घेतला, तर हा त्यांच्या चाहत्यांसाठी खरोखर मोठा धक्का असेल. चाहते या प्रकरणावर व्यक्त होत आहेत. अशातच सानिया मिर्झाच्या एका पोस्टने या प्रकरणाला अजूनच हवा देण्याचे काम केले. तिने ही पोस्ट स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरीला शेअर केली होती.

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सानियाने चाहत्यांना एकप्रकारे सल्ला दिला आहे. तिने चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जेव्हा मनावर दडपण आल्यासारखे वाटत असेल, तेव्हा काही काळ विश्रांती घेतली पाहिजे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही प्रकाश आणि अंधारापासून बनलेला मानुस आहात. स्वतःवर एवढे प्रमे करा की, स्वतःला नाजुक होण्याचीही संधी द्या. या दिवसांमध्ये स्वतःला थोडी विश्रांती द्यायला शिका, जेव्हा तुमेच्या मनावर दडपण असल्यासारखे वाटत असेल.”

sania mirza
sania mirza

तत्पूर्वी सानिय या बातम्या समोर येण्यास सुरुवात झाली, तेव्हाही सानियाने अशीच एक स्टोरी शेअर केली होती. तेव्हा तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते की, “टुटलेले ह्रदय इश्वराकडे जात असते.” या दोघांचाया घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यानंतर चाहत्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, सानिया आणि शोएबने नुकतीच एका कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘मिर्झा मलिक शो’ असे आहे. तसेच शोएबने सानियाला तिच्या वाढदिवशी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छआ देखील दिल्या होत्या. अशात या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे देखील अनेकांना वाटते. येत्या काही दिवासांमध्ये हे संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल, अशी अपेक्षा सर्वांना आहे. (Sania Mirza’s post is going viral amid reports of divorce)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’
सूर्यकुमार भारताच्या ‘या’ फलंदाजाचा फॅन! स्वत:च सांगितले कारण, नाव ऐकून व्हाल चकित  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---