---Advertisement---

सूर्यकुमार भारताच्या ‘या’ फलंदाजाचा फॅन! स्वत:च सांगितले कारण, नाव ऐकून व्हाल चकित

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 1:04 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने जरा उशिराच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने मार्च 2021मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. निराश न होता त्याने दुसऱ्याच सामन्यात 57 धावांची खेळी केली. तेव्हापासून सुरू झालेला तो धावांचा पाऊस आजही सुरू आहे. त्याने त्याच्या फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आणि अनेक खेळाडू त्याचे चाहते झाले, मात्र सूर्यकुमारला एक प्रश्न असा विचारण्यात आला ज्यामध्ये त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma)याचा उल्लेख केला.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारताचा ‘टी20 स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून विविध प्रकारचे शॉट्स बाहेर पडतात. ज्यामुळे विरोधी संघातील खेळाडूंही त्याचे कौतुक करतात. तो एका माध्यमाला मुलाखत देत होता. त्यावेळी त्याला विचारण्यात आलेला प्रश्न चकित करणारा तर होताच मात्र त्याचे उत्तरही ऐकून चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल. त्याला विचारण्यात आले, ‘जर तुम्हाला कोणत्याही फलंदाजाकडून एखादा शॉट चोरायचा असेल तर तो कोणता असेल?’ यावर सूर्यकुमार उत्तरला, ‘रोहित शर्माचा पूल शॉट’

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा पूल शॉट सूर्यकुमारचाही आवडता असल्याचे समोर येत आहे. रोहित-सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. सूर्यकुमारने अनेकदा सांगितले आहे की, रोहितने त्याला कशी मदत केली आणि त्याच्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी टीप्सही तो देत होतो, असेही सूर्यकुमारने त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने रोहित-विराटचा एका व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये विराटने रोहितच्या पूल शॉटचे कौतुक केले होते.

सूर्यकुमार यावर्षी तर चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने 2022मध्ये भारताकडून आतापर्यंत 31 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 46.56च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत 3 अर्धशतकी खेळी केल्या आणि विराट कोहली नंतर भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यामध्ये त्याने 6 सामन्यात 59.75च्या सरासरीने 239 धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कडाक्याच्या थंडीत बाईक चालवावी लागली, पण पठ्ठ्याने अखेर विराटला भेट घेतलीच
हिटमॅनची तयारी सुरू! बांगलादेश दौरा गाजवण्यासाठी गाळतोय घाम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---