---Advertisement---

कडाक्याच्या थंडीत बाईक चालवावी लागली, पण पठ्ठ्याने अखेर विराटची भेट घेतलीच

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 12:40 PM
Virat Kohli in Uttarakhand
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आशिया चषक 2022 पूर्वी मात्र चित्र पूर्पपणे वेगळे होते. त्यावेळी जवळपास सलग तीन वर्ष विराटने एकही शतक केले नव्हते, पण आता तो जुन्या लयीत परतला आहे. विराटला भेटणे हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे स्वप्न असते. विराटच्या अशाच एका चाहत्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे, पण यासाठी त्याने सकाळी सहा वाजता उठून प्रवासाची सुरुवात केली होती. 

काही दिवसांपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा खैची धाम मंदीरात पोहोचले होते. त्याठिकाणचे त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते. पण यादरम्यान एक चाहता असा होता, जो विराटला भेटण्यासाठी पहाटे उठून आणि मोठा प्रवास करत याठिकाणी पोहोचला. खैची धाममध्ये त्याच्या आधीपासून विराटला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. पण या गर्दीतून त्याने मार्ग काढत विराटपर्यंत पोहोचला. विराटच्या या चाहत्याचे नाव कपिल असून त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/ClEYIFljCpj/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओत दिसत आहे की, कपील पहाटे सहा वाजता कडाक्याची थंडी पडलेली असताना उठला. एवढ्या थंडीत तो आणि त्याचे मित्र बाईक वरून खैची धामसाठी रवाना होतात. या प्रवासाचा व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये शूट केला होता, जो नंतर सर्वांसोबत शेअर केला. विराटसोबत झालेल्या भेटीचा अनुभव त्याने सांगितले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही त्याठिकाणी पोहोचलो, पण आम्हाला काहीच माहिती नव्हते. आम्ही स्थानिक लोकांना विराटविषयी विचारायला सुरुवात केली. पण काहीजण सांगत होते की, तो मंदीरात आहे, तर काही म्हणत होते की, सकाळी पाच वाजता मंदीरात येईल. अशात सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही त्याची वाट पाहिली.

खूप वेळ पाट पाहिल्यानंतर अखेर कपिल आणि त्याच्या मित्रांना विराटला भेटण्याची संधी मिळाली. यादरम्यान विराटकडून देखील कोणत्याच चाहत्याची निराशा झाल्याचे दिसले नाही. तो उपस्थित असलेल्या प्रत्येक चाहत्यासोबत फोटो घेताना दिसत होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला आठवला पाकिस्तानविरुद्धचा सामना, इंस्टाग्रामवर खास फोटो पोस्ट करत दिली ‘ही’ रिऍक्शन
“त्यादिवशी द्रविडने धोनीला खडसावले आणि फिनीशरचा जन्म झाला”    

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---