---Advertisement---

अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 3:01 PM
Shreyas Iyer
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध भारताने पहिला वनडे सामना गमावला आणि संघावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्या. या पराभवावरून श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आम्ही लक्ष्य चांगले दिले होते, मात्र काही गोष्टी आमच्याविरुद्ध घडल्या. तरीही या सामन्यातून आम्ही खूप काही शिकत पुढे जात आहोत.

भारताचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात असून पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ऑकलंड येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धाव केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 48 षटकातच 3 विकेट्स गमावत सामना जिंकला. या सामन्यात विकेटकीपर-फलंदाज टॉम लॅथम याने नाबाद 145 धावा केल्या. यामुळे तो समनावीर ठरला.

या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने केल्या. त्याने 76 चेंडूत 80 धावा केल्या. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने म्हटले, “आता काही आम्ही थेट टी20 सारखे खेळू शकत नाही. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक बदल होतात. एकतर तो सामना अधिक वेळेचा असल्याने सूर्यप्रकाश, दवबिंदू यांच्यात चढउतार होत असतो. त्या सामन्यात 307 हे लक्ष्य चांगले होते. काही गोष्टी निश्चितच आमच्या मनासारख्या झाल्या नाही, मात्र यामधून आम्ही खूप काही शिकू शकतो. आम्ही याचा विचार करून पुढच्या सामन्यासाठी योग्य ती योजना आखू. भारतातून येथे येत थेट खेळणे अवघड आहे. प्रत्येकवेळी विकेट बदलत राहते.”

“केन विलियम्सन आणि लॅथम यांनी उत्तम फलंदाजी केली. त्यांना माहित होते कोणत्या गोलंदाजाला कधी कोणता शॉट खेळायचा आहे ते. त्यांच्या भागीदारीमुळेच सामना पूर्णपणे बदलला,” असेही अय्यरने पुढे म्हटले. बीसीसीआयने अय्यरच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ त्यांच्या वेबसाईटवर शेयर केले आहे.

या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. मालिकेत आपले आव्हान कायम राखायचे असेल तर भारताला दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. after loss vs New Zealand shreyas iyer faced press conference & shut down the critics

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दणदणीत विजयासह मुंबई सिटी एफसी टेबल टॉपर; नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग सातवा पराभव
VIDEO: इंग्लंडनंतर बांगलादेशचे मैदान! चेतेश्वर पुजाराची दौरा गाजवण्याची तयारी जोरात सुरू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---