वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास जवळपास 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वीच आजी-माजी क्रिकेटपटूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याच्या नावाचाही समावेश आहे. ख्रिस गेलने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेविषयी भविष्यवाणी केली आहे. गेलने सांगितले आहे की, कोणकोणते चार संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवू शकतात. हैराण करणारी बाब म्हणजे, गेलने आपल्या चार संघांमध्ये पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला सामील केले नाहीये.
ख्रिस गेलने निवडले चार संघ
ख्रिस गेल (Chris Gayle) याने सांगितले की, यावर्षी विश्वचषकासाठी कोणकोणते संघ प्रबळ दावेदार असतील. गेलच्या मते, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकतात. गेलने उपांत्य सामन्यातील संभावित संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या तगड्या संघांना सामील केले नाहीये.
के श्रीकांत काय म्हणालेले?
विशेष म्हणजे, यापूर्वी भारताचे माजी सलामीवीर फलंदाज के श्रीकांत यांनी तीन संघ विश्वचषक जिंकण्यासाठी दावेदार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, भारत दावेदार असणाऱ्या संघांपैकी एक आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर ऑस्ट्रेलिया संघही खूप चांगला आहे आणि इंग्लंडही जबरदस्त राहिला आहे. ऑस्ट्रेलिया संघ भारतात चांगला खेळेल. माझ्यामते, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विजयासाठी प्रबळ दावेदार आहेत. यापैकी एक संंघ विश्वचषकाची ट्रॉफी जिंकेल.
स्पर्धेविषयी थोडक्यात
भारतात यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि मागील वेळचा उपविजेता न्यूझीलंड संघ यांच्यात अहमदाबाद येथे पहिला सामना खेळला जाईल. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना मुंबई, दुसरा उपांत्य सामना कोलकाता आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल.
भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली येथे दुसरा सामना खेळेल. (cricketer chris gayle predicts his four semi finalist for world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
रत्नागिरी जेट्सचे पाच पांडव! सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला बनवले चॅम्पियन
पुणेरी दणका! ट्रॉफी गमावूनही ‘बाप्पा’च्या नावावर जबरदस्त रेकॉर्डची नोंद, इतर 5 संघ बघतच राहिले