येत्या ९ जून ते १९ जून यादरम्यान होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यापूर्वी २९ मे रोजी इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना पार पडला. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडलेल्या या अंतिम सामन्यात गुजरातने बाजी मारत सामना जिंकला. तसेच, पहिल्या-वहिल्या आयपीएल हंगामाची ट्रॉफीही उंचावली. गुजरातच्या या विजयात दक्षिण आफ्रिका संघाचा धडाकेबाज फलंदाज डेविड मिलर याचा मोलाचा वाटा होता. आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करत मिलरला मिळालेला आत्मविश्वास भारताविरुद्धच्या मालिकेतही कायम राहण्याची अपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा कर्णधार तेंबा बावुमा याला आहे.
मिलरबाबत काय म्हणाला बावुमा
डेविड मिलर (David Miller) याच्याबाबत बोलताना कर्णधार तेंबा बावुमा (Temba Bavuma) म्हणाला की, तो राष्ट्रीय संघातील त्यांच्या फलंदाजी क्रमातील बदलाबाबत चर्चा करू शकतो. पुढे बोलताना तो म्हणाला की, “खेळाडूंना फॉर्ममध्ये पाहून नेहमीच चांगले वाटते. मिलरसारख्या खेळाडूने गुजरात टायटन्स संघासोबत आयपीएलचे किताब पटकावले आणि आता तो आत्मविश्वास घेऊन संघात आला आहे.”
“त्याला फलंदाजीसाठी अधिक वेळ देण्यासाठी आम्ही त्याच्या फलंदाजी क्रमातही बदल करू शकतो. आम्ही संघात त्याची जागा पक्की असल्याचे पाहतो,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला. मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी करणारा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) याच्याबाबत बोलताना तो म्हणाला की, त्याला आपल्या कौशल्ये वाढवण्यासाठी आणखी वेळ देण्याची गरज आहे.
ब्रेविसबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, “त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाहीये. त्याला आपला खेळ सुधरवण्यासाठी आणि समजण्यासाठी संधी दिली पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला लगेच दबावात टाकले नाही पाहिजे. त्याला जरा वेळ देण्याची गरज आहे.”
विशेष म्हणजे, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या गुजरात टायटन्स संघाचा भाग राहिलेल्या डेविड मिलर हा बऱ्याच काळानंतर जुन्या अंदाजात दिसला आहे. त्याने संघाला अनेक एकहाती सामने जिंकून दिले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाला त्याच्याकडून भारताविरुद्धच्या मालिकेतही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
मिलरची आयपीएल २०२२मधील कामगिरी
डेविड मिलर याने या हंगामात एकूण १६ सामने खेळले. यादरम्यान त्याने ६८.७१च्या सरासरीने ४८१ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ अर्धशतकांचाही पाऊस पाडला.
महास्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियात सामील होण्याआधी केएल राहुलची बहारिनच्या खेळाडूच्या लग्नात धमाल, Photo होतायेत व्हायरल
भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; आठपैकी दोन सामने होणार अमेरिकेत