नुकताच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १५वा हंगाम संपला. त्यानंतर सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावर लागल्या आहेत. येत्या ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघात ५ टी२० सामन्यांची मालिका होणार असल्याचे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आता या मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यावर थेट न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेबाबत ओडिशा उच्च न्यायालयात (Odisha High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकामध्ये कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणारा मालिकेतील दुसरा टी२० सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. भुबनमधील ढेंकनाल जिल्ह्यातील संजय नायक यांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेत नायक यांनी दावा केला आहे की, “बाराबती स्टेडियममध्ये आगीचा सामना करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे प्रस्तावित भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० सामना रद्द व्हावा,” अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. ओडिशा न्यायालयाने २६ मे रोजी टी२० सामन्याच्या पार्श्वभूमीवर बाराबती स्टेडियमवर आग विझवण्यासाठी आवश्यक सुरक्षा सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप या सुविधांची व्यवस्था केली नसल्याचा आरोप नायक यांनी केला आहे
दरम्यान, बाराबती स्टेडियमवर दोन्ही देशांच्या संघांमध्ये १२ जून रोजी हा सामना होणार आहे. या संपूर्ण मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्मधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासह फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शामी (Mohammed Shami) या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा केएल राहुलच्या (KL Rahul) खांद्यावर देण्यात आली आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा-
‘त्यानेही तेच केले, जे मी केले असते’, वनडेत त्रिशतक ठोकणाऱ्या भारतीय दिग्गजाकडून संजूचं कौतुक
‘मी पैज लावू शकतो की, तो ११० शतक करेल’, भारतीय नाही; तर पाकिस्तानी दिग्गजाचा विराटवर विश्वास
रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी






