कुठल्याच भारतीय क्रिकेटप्रेमीला 19 नोव्हेंबर, 2023 ही तारीख कधीच लक्षात ठेवू वाटणार नाही. कारण, याच दिवशी नेंद्र मोदी स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. ऑस्ट्रेलिया भारताला 6 विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आपल्या बॅटमधून खास प्रदर्शन करण्यात अपयशी ठरला, पण संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपली. तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा (535) करणारा फलंदाज राहिला. अशात वॉर्नरने चाहत्यांची माफी मागितली आहे.
डेविड वॉर्नरने मागितली माफी
ऑस्ट्रेलिया संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर 37 वर्षीय सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याने 140 कोटी भारतीयांचे मन जिंकणारी पोस्ट केली आहे. सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांना आशा होती की, यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे विश्वचषकाचा किताब जिंकेल. मात्र, अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे चाहते निराश झाले. भारताच्या पराभवानंतर काही खेळाडू मैदानातच भावूक झाले होते. यादरम्यान त्यांच्या डोळ्यातील अश्रूही दिसत होते.
अशात आता ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मोठे मन दाखवत भारतीय चाहत्यांसोबत त्यांच्या दु:खात सामील झाला. वॉर्नरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून लिहिले की, “मला माफ करा, हा खूपच चांगला सामना होता आणि माहोल अविश्वसनीय होता. भारताने खरंच एक जबरदस्त आयोजन केले. तुम्हा सर्वांना धन्यवाद.”
I apologise, it was such a great game and the atmosphere was incredible. India really put on a serious event. Thank you all https://t.co/5XUgHgop6b
— David Warner (@davidwarner31) November 20, 2023
विश्वचषकातील वॉर्नरचे प्रदर्शन
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत डेविड वॉर्नर (David Warner World Cup 2023) याची बॅट चांगलीच तळपली. तो संघासाठी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. तसेच, तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज बनला. त्याने यादरम्यान एकूण 11 सामने खेळले. यादरम्यान त्याने 48.63च्या सरासरीने 535 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून यावेळी 2 शतके आणि 2 अर्धशतकेही निघाली. (cricketer david warner i apologise india vs australia final odi world cup 2023)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन बनताच युजर्सनी दाखवली लायकी! क्रिकेटर्सच्या कुटुंबाला ट्रोल करताच भडकला हरभजन; म्हणाला…
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का! भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतून वॉर्नर बाहेर, महत्त्वाचं कारण आलं समोर