भारतीय संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशमध्ये आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. यामध्ये केएल राहुल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन्ही डावात दमदार प्रदर्शन केले आहे. पहिल्या डावात भारताने 404 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना बांगलादेश संघाचा डाव 150 धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेतली होती. यादरम्यान भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये शानदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीवर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिककडून कौतुक
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने माध्यमांशी बोलताना कुलदीप यादव याच्या कामगिरीची प्रशंसा केली. कार्तिक म्हणाला की, “माझ्यासाठी सर्वात भारी क्षण कुलदीपने शाकिब अल हसन याला फेकलेला चेंडू होता. तो चांगला फिरकीपटू आहे. त्याला माहीत आहे की, फिरकीला कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे. बाहेर गेला, पण चेंडू फक्त थोडा समोर आला आणि चुकीचा शॉट खेळण्यासाठी चेंडू जरासा वळला. ही वास्तवात चांगली गोलंदाजी होती. त्या चेंडूमुळे कुलदीपला खूपच आत्मविश्वास मिळाला असेल. ही त्याच्या गोलंदाजीची चांगली सुरुवात होती.”
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “तिथून तुम्ही कुलदीपला पूर्ण प्रवाहात पाहू शकता. तो चांगल्या फलंदाजांना चिंतेत टाकतो. तुम्ही त्याच्यानंतर आलेल्या फलंदाजांना पाहू शकता. त्यांना खेळण्यासाठी वास्तवात संघर्ष करावा लागला. हे खरंच उत्साहजनक होते. हे भारताला तेव्हाही चांगल्या स्थितीत ठेवेल, जेव्हा ते परदेशातील दौरा करतील. खासकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी. तो हुकमी एक्का बनेल.”
कुलदीपची कामगिरी
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने पहिल्या डावात फलंदाजी करताना 40 धावा चोपल्या होत्या. तसेच, त्याने गोलंदाजी करतानाही मोलाचे योगदान दिले होते. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा बदली खेळाडू म्हणून संघात उशीरा आलेल्या कुलदीपने आपल्या कामगिरीने सर्वांनाच भुवया उंचावण्यास भाग पाडले. त्याने बांगलादेशच्या डावादरम्यान दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेश 8 बाद 133 धावांवर खेळत होता. यामधील 4 विकेट्स या कुलदीपच्या होत्या, ज्या त्याने 33 धावा खर्च करत घेतल्या होत्या.
कुलदीपने त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला विराट कोहली याच्या हातून फक्त 3 धावांवर झेलबाद केले. त्यामुळे बांगलादेशची धावसंख्या 5 बाद 75 झाली होती. त्यानंतर कुलदीपने नुरूल हसन (16), मुशफिकुर रहीम (28) आणि तैजुल इस्लाम (0) याची विकेट घेत भारताला मजबूत स्थितीत आणले.
Third five-wicket haul for Kuldeep Yadav in Tests 👏#BANvIND | #WTC23 | 📝 https://t.co/ym1utFHoek pic.twitter.com/VFQ9ugi3s7
— ICC (@ICC) December 16, 2022
मात्र, पुढे त्याने पाचव्या विकेटच्या रूपात बांगलादेशच्या इबादत हुसेन याला 17 धावांवर बाद करत तंबूत पाठवले. अशाप्रकारे त्याने त्याचे विकेट्सचे पंचक पूर्ण केले. यावेळी त्याने फक्त 40 धावा खर्च केल्या होत्या. अशी कामगिरी करण्याची ही त्याची तिसरी वेळ होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू…डोक्यावर घेऊ नको’, द्विशतकानंतर ईशानने फोन करताच ‘अशी’ होती वडिलांची प्रतिक्रिया
तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ खेळाडूंच्या बॅटमधून निघाले शतक, यादीत दोन भारतीय