भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहे, ज्यांच्यात चौकार- षटकार मारण्याची क्षमता ठासून भरलेली आहे. त्या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्या नावाचाही समावेश होतो. कार्तिक त्याच्या फिनिशरच्या भूमिकेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2022मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी त्याने दमदार कामगिरी करत सामने जिंकून दिले होते. अशात आयपीएल 2023मध्येही बेंगलोर संघाला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. टी20लीगसाठी इतर खेळाडू जोरदार तयारी करत आहेत, तिथे कार्तिकने डी.वाय. पाटील स्पर्धेत फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याने ताबडतोब अर्धशतक ठोकत गोलंदाजांच्या बत्त्या गुल केल्या आहेत.
दिनेश कार्तिकचा वादळी दणका
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने मुंबईत खेळल्या जात असलेल्या डी. वाय. पाटील स्पर्धेत (DY Patil Tournament) ब गटासाठी फलंदाजी करताना दिनेश कार्तिक याने वादळी फलंदाजी केली. तसेच, संंघासाठी मोलाचे योगदान दिले. त्याने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात वादळी अर्धशतक साकारत आयपीएलसाठीच्या तयारीबाबत विरोधी संघांना सावध केले.
कार्तिकने या स्पर्धेत वादळी दणका दाखवत पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याच्या या कामगिरीमुळे खेळाडूंसह स्टेडिअममध्ये बसलेले प्रेक्षकही आनंदी झाले. कार्तिकने यादरम्यान 38 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. तसेच, टीम इंडियाचे दारही ठोठावले आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1627930285722710016?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1627930285722710016%7Ctwgr%5Ed9c4bb35a4fe12f6dc4f625d36903c16e3c3bfd0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fdinesh-karthik-played-smoky-innings-before-ipl-in-dy-tournament-scored-75-runs%2F
असा आहे आतापर्यंतचा सामना
डी.वाय. पाटील स्पर्धेत 21 फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात ब गट आणि आरबीआय संघ आमने-सामने होते. ब गटातील संघाने प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात केली. सलामीवीर फलंदाज हार्दिक आणि केविन लवकर बाद झाले. त्यानंतर यश धूल याने डाव सांभाळला. मात्र, तोदेखील 29 धावांवर बाद झाला.
त्यानंतर पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या दिनेश कार्तिक याने फलंदाजीला येताच पहिल्या चेंडूपासून चौकार- षटकार मारण्यास सुरुवात केली. कार्तिकने त्याच्या डावात 38 चेंडूंचा सामना केला. या धावा करताना त्याने 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. विशेष म्हणजे, चौकार षटकार मिळून त्याने 11 चेंडूत 56 धावा कुटल्या. तो शेवटपर्यंत क्रीझवर टिकून खेळला. तसेच, त्याने संघाला 186 धावांचा पल्ला गाठण्यास मदत केली.
https://twitter.com/JunaidKhanation/status/1627942071259766784
आयपीएलची सुरुवात
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेची सुरुवात पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून होणार आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गतविजेता संघ गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) आमने-सामने असतील. हा सामना अहमदाबाद येथे पार पडेल. यावेळी स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 70 साखळी सामने खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 18 डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळले जातील. (cricketer dinesh karthik played smoky innings before ipl in dy patil tournament scored 75 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही तर हाईटच झाली! चाहतीने विराटला सर्वांसमोर केले किस? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर