एका मोठ्या काळानंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचे मैदानावर पुनरागमन झाले आहे. त्याला भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. रविवारी (१२ जून) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात त्याच्या फलंदाजीवर नजर असेल. अशातच आता कार्तिकने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला आहे की, जर त्याच्याकडे कुणाच्याही मनात काय चाललंय हे जाणून घेण्याची क्षमता असती, तर त्याला नक्कीच एमएस धोनी (MS Dhoni) याच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायला आवडल्या असत्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) म्हणजेच बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कार्तिक आपल्या आवडी-निवडीबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. यादरम्यान त्याला विचारण्यात आले की, त्याला संघासोबत जेवण करायला आवडेल की, सिनेमा पाहणे? यावर त्याने “भारतीय संघासोबत बसून जेवण करायला आवडेल,” असे सांगितले. यानंतर त्याला विचारले की, त्याला चहा आणि कॉफी यापैकी काय आवडते? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने चहाला प्राधान्य दिले.
Mountain ⛰️ or Beach 🏖️
Federer or Nadal 🤔
Tea 🫖 or Coffee ☕️
𝗧𝗵𝗶𝘀 𝗢𝗥 𝗧𝗵𝗮𝘁 – Do not miss this fun segment with @DineshKarthik! 😎 😎 #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/QHCsiLsLLq
— BCCI (@BCCI) June 12, 2022
ज्यावेळी कार्तिकला डान्सबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला की, “हे जरा कठीण आहे.” पुढे बोलताना तो म्हणाला की, त्याला बीचपेक्षा पर्वत असतील अशा भागात जायला आवडेल. कारण, त्याला अशा ठिकाणी शांतता मिळते. यादरम्यान त्याने म्हटले की, त्याला रॉजर फेडरर याच्यासोबत लंच करायला आवडेल. फेडरर याला त्याने आपला आवडता टेनिसपटूही सांगितले.
‘धोनीच्या मनातील गोष्टी जाणून घेतल्या असत्या’
दिनेश कार्तिक याला जेव्हा विचारण्यात आले की, जर त्याच्याकडे मनातील गोष्टी जाणून घेण्याची क्षमता असती, तर त्याने कुणाच्या मनातील गोष्टी जाणून घेतल्या असत्या? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “जर माझ्याकडे कोणाच्याही मनातील गोष्टी जाणून घेण्याची क्षमता असती, तर मी निश्चितच एमएस धोनी याच्या मनातील गोष्टी जाणून घेतल्या असत्या.” धोनी हा त्याच्या शानदार रणनीतीसाठी ओळखला जातो.
आयपीएलमध्ये साकारली फिनिशरची भूमिका
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२च्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळताना दिनेश कार्तिक याने शानदार फटकेबाजी केली. या हंगामात त्याने बेंगलोर संघासाठी फिनिशरची भूमिका साकारत संघाला अनेक विजय मिळवून दिले. कार्तिक याने या हंगामात १६ सामन्यात फलंदाजी करताना ५५च्या सरासरीने १ अर्धशतक झळकावत ३३० धावा चोपल्या होत्या. यादरम्यान त्याची नाबाद ६६ ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा
‘शतकवीर’ टॉम ब्लंडेलने इंग्लंडच्या मैदानावर रचला इतिहास, विरोधी संघाच्या प्रशिक्षकाचाच मोडला रेकॉर्ड