भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना धावांचा पाऊस पाडत आहे. एकीकडे असे असताना, दुसरीकडे त्याची पत्नी दीपिका पल्लीकलही त्याच्यापेक्षा कमी नाहीये. तीदेखील एक खेळाडू आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ६ महिन्यांहून कमी काळात तिने शनिवारी (०९ एप्रिल) जागतिक अजिंक्यपद दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत पुनरागमन केले आहे. दीपिकाने आपला जोडीदार सौरव घोषाल आणि दीर्घकाळापासून संघातील जोडीदार जोशना चिनप्पासोबत मिळून जागतिक अजिंक्यपद मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
दीपिका पल्लीकलने ऑक्टोबर २०१८नंतर पहिल्यांदाच कोणत्याही प्रतिस्पर्धी इव्हेंटमध्ये भाग घेतला. तिने सौरव घोषालसोबत मिळून पहिल्यांदा मिश्र दुहेरी स्पर्धेचा किताब जिंकलाय. अंतिम सामन्यात भारताच्या या जोडीने इंग्लंडच्या एड्रियन वॉलर आणि ऍलिसन वॉटर्सच्या जोडीला ११-०६, ११-०८ने मात दिली.
हेही वाचा- जीम ते इंग्लड व्हाया चेन्नई! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लिकल यांनी अशी फुलली प्रेम कहाणी
दीड तासांमध्ये जिंकले दुसरे सुवर्ण पदक
दीपिकाने मिश्र दुहेरी स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकण्याच्या दीड तासानंतर महिला मिश्र स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकले. तिने आपली जोडीदार जोशना चिनप्पासोबत इंग्लंडच्या सारा जेन पेरी आणि वॉटर्सला पराभूत केले. मात्र, या सामन्यात त्यांना इंग्लंडच्या खेळाडूंकडून चांगलेच आव्हान मिळाले होते, पण भारतीय जोडीने चांगला खेळ करत अंतिम सामना ११-०९, ०४-११, ११-०८ने आपल्या नावावर केला.
The winners of the 2022 WSF World Doubles Championships 🏆
Mixed: 🇮🇳 🥇
Women's: 🇮🇳 🥇
Men's: 🏴 🥇Congratulations to them and to silver and bronze medallists 🏴 🏴 🇲🇾 👏#WSFDoubles #Glasgow2022 #Squash pic.twitter.com/JRWE6xFIlf
— World Squash (WSF) (@WorldSquash) April 9, 2022
राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशिया गेम्ससाठी शानदार तयारी
हे वर्ष राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशिया गेम्सचे आहे. जागतिक अजिंक्यपद दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत ज्याप्रकारे भारतीय त्रिकुट दीपिका, जोशना आणि घोषालने कामगिरी केली आहे, ही त्यांच्यासाठी चांगली तयारी होती. भारताचे हे सर्व स्क्वॉश खेळाडू १५हून अधिक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करत आहेत. या खेळाडूंना अपेक्षा आहे की, जागतिक मिश्र स्पर्धेत केलेल्या त्यांच्या कामगिरीवर लक्ष दिले जाईल. ते सर्व सरकारच्या ऑलिम्पिक पोडियम योजनेत परत आले आहेत.
दिनेश कार्तिकसोबत लग्न
आयपीएलमध्ये बेंगलोर संघाचा किल्ला लढवत असलेला ३६ वर्षीय दिनेश कार्तिकने २०१५ साली दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले होते. त्यांना कबीर आणि झियान ही दोन जुळी मुलंही आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये चौकार-षटकारांच्या ‘या’ विक्रमात विराटच ‘किंग’, आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम नावावर
आयपीएलच्या मध्यात हर्षल पटेलवर कोसळला दुःखाचा डोंगर; मायेचा आधार कायमचा हरपला
IPL 2022 | केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. लखनऊ सामना, कशी असेल खेळपट्टी; जाणून घ्या सर्वकाही