पाकिस्तानात जाऊन न्यूझीलंड संघाने मैदान मारले आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-1ने आघाडी घेत पाकिस्तानला धूळ चारली आहे. शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) मालिकेतील अखेरचा सामना कराची येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 2 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानने सलामीवीर फखर जमान याच्या शतकी खेळीमुळे दोनशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, न्यूझीलंडने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना नावावर केला.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 280 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 48.1 षटकात 8 विकेट्स गमावत 281 धावा केल्या आणि विजय साकारला. न्यूझीलंडकडून तीन खेळाडूंनी अर्धशतक केले. त्यात डेवॉन कॉनवे (52), केन विलियम्सन (53) आणि ग्लेन फिलिप्स (नाबाद 63) यांचा समावेश आहे.
या सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना अधिक चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने कोणत्याही वेगवान गोलंदाजाकडून 10 षटके पूर्ण गोलंदाजी करवून घेतली नाही. दुसरीकडे, पत्रकार परिषदेदरम्यान जेव्हा बाबरच्या जागी फखर जमान (Fakhar Zaman) आला, तेव्हा त्याच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे त्यालाही घाम फुटला. झाले असे की, एका पत्रकाराने त्याला विचारले की, पाकिस्तानच्या कोणत्याही वेगवान गोलंदाजाने 10 षटके पूर्ण गोलंदाजी केली नाही. ज्यावेळी समजले होते की, या खेळपट्टीवर आपले वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकणार नाहीत, तर आपण तय्यब इकारमला खेळवू शकले होतो. त्यामुळे एका फलंदाजाचा फायदा झाला असता?
पत्रकाराचा प्रश्न ऐकल्यानंतर फखर म्हणाला की, “क्रिकेट हा परिस्थितीनुसार खेळला जातो. न्यूझीलंडच्या टीम साऊदीनेही मागील दोन सामन्यात 10 षटके गोलंदाजी केली नव्हती. सामन्यात फिरकीपटूंना जास्त फायदा मिळत होता. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्यांची 10 षटके पूर्ण करता आली नाहीत. आगा सलमान आमचा मुख्य गोलंदाज नाहीये, परंतु परिस्थिती पाहून त्याने 10 षटके गोलंदाजी केली. मला वाटते की, आम्ही वेगवान गोलंदाजाकडून 10 षटके गोलंदाजी करवून घेतली नाही, याची काही बाब नाही. सलमानने चांगली गोलंदाजी करत त्यांना सावरले. कर्णधाराचाही प्रयत्न असतो की, जर कोणत्या गोलंदाजाचा दिवस चांगला नसेल, तर तो पार्ट टाईम गोलंदाजाकडून गोलंदाजी करवून घेतो.”
Fakhar Zaman responds to a question about why Pakistan's pacers bowled few overs in the ODI series.#PAKvNZ pic.twitter.com/hrI5bTSRgW
— Grassroots Cricket (@grassrootscric) January 13, 2023
तिसरा वनडे सामना रोमांचक ठरला. या सामन्यात कधी पाकिस्तान, तर कधी न्यूझीलंड संघाचे पारडे जड असल्याचे दिसले. न्यूझीलंड संघ एकेवेळी 205 धावांवर 6 विकेट्स गमावून खेळत होता. मात्र, ग्लेन फिलिप्स याने जबरदस्त फलंदाजी करून पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. फिलिप्सने 42 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत नाबाद 63 धावा कुटल्या. विशेष म्हणजे, पाकिस्तानला 54 वर्षात पहिल्यांदाच आपल्या मायदेशात न्यूझीलंडकडून मालिका गमवावी लागली आहे. (cricketer fakhar zaman reacts on why any pakistani pacer does not complete his 10 overs spell against nz 3rd odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उंचीवर जाऊन मैदानातच पडला चेंडू, तरीही पंचांनी दिला षटकार; व्हिडिओ जोरदार व्हायरल
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे स्वरुप बदणार बीसीसीआयने केले स्पष्ट! कधी आणि कोणता बदल होणार घ्या जाणून