कतार येथे बहुप्रतिक्षित लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 10 मार्च) इंडिया महाराजा विरुद्ध आशिया लायन्स संघात पार पडला. हा सामना आशिया लायन्सने 9 धावांनी खिशात घातला. विशेष म्हणजे, या दोन्ही संघांचे कर्णधार हे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू आहेत. म्हणजेच, इंडिया महाराजा संघाचा कर्णधार गौतम गंभीर आहे, तर आशिया लायन्स संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे. त्यामुळे आता त्यांचा नाणेफेकीचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यावरून नेटकरीही वेगवेगळी मीम्स शेअर करत आहेत.
या सामन्यात नाणेफेक जिंकत आशिया लायन्स संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लायन्सने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 165 धावा केल्या. यामध्ये मिस्बाह उल हक याने 50 चेंडूत 73 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंडिया महाराजा संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 156 धावाच करता आल्या. यावेळी महाराजाकडून कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने 39 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली. हा सामना लायन्सने 9 धावांनी जिंकला. या सामन्यातील कामगिरीसाठी मिस्बाहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सोशल मीडियावर चाहत्यांनी घेतली मजा
या सामन्यातील नाणेफेकीदरम्यान एक असा क्षण पाहायला मिळाला, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर, नाणेफेकीवेळी शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने गौतम गंभीरशी हात मिळवणी केली. त्यावेळी गौतमचा चेहरी खूपच गंंभीर होता. त्याने आफ्रिदीकडे बघितलेदेखील नाही.
याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही मजा घेतली. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “दोन जीवलग मित्र एकमेकांना भेटताना.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “इथेच हातापाई नको व्हायला.” या सामन्यादरम्यानही अनेकदा गंभीर आणि आफ्रिदीमध्ये तणाव पाहायला मिळाला.
The big-hearted Shahid Afridi and Gautam Gambhir meet at the Legends game #Cricket #LegendsLeagueCricket pic.twitter.com/YzTZhaPJCU
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) March 10, 2023
Gautam Gambhir & Shahid Afridi meet at the Legends League Cricket.#LLCT20 #LegendsLeagueCricket pic.twitter.com/eodF1SLhjD
— Muhammad Qamar (@mohammadqamar6) March 10, 2023
https://twitter.com/Awesomo_Vines/status/1634215956703502336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1634215956703502336%7Ctwgr%5Efe3cc73c2cfa4a091873944b55171d09deea5533%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Fgautam-gambhir-vs-shahid-afridi-team-in-the-legends-league-cricket-gambhir-vs-afridi-asia-lions-beat-india-maharajas-tspo-1652314-2023-03-11
'Big-hearted' Shahid Afridi inquires if Gautam Gambhir is ok after that blow ❤️#Cricket pic.twitter.com/EqEodDs52f
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 10, 2023
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही तापलेले वातावरण
विशेष म्हणजे, जेव्हाही गंभीर आणि आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामने व्हायचे, तेव्हा या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलेच वातावरण तापायचे. अनेकदा कठीण स्थिती निर्माण व्हायची. एकदा गंभीर आणि आफ्रिदीमध्ये हातापाई होण्याचीही वेळ आली होती. मात्र, संघसहकाऱ्यांनी आणि पंचांनी प्रकरण मिटवले होते.
असे असले, तरीही आता सोशल मीडियावर नेटकरी या क्षणाची मजा लुटत आहेत. (cricketer gautam gambhir vs shahid afridi team in the legends league cricket asia lions beat india maharajas)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनने उंचावली भारतीयांची मान! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा तिसरा युवा खेळाडू, इतर दोघे कोण?
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक