---Advertisement---

हनुमा विहारीला स्वत:चं करिअर घालायचंय धोक्यात? धक्कादायक खुलासा करत म्हणाला, ‘यानंतर क्रिकेट खेळता…’

On: रविवार, फेब्रुवारी 5, 2023 10:24 PM
Hanuma-Vihari
---Advertisement---

क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात अनेकदा खेळाडूंची दुखापतीमुळे कारकीर्द संपुष्टात येते. मात्र, काही खेळाडू असेही असतात, जे दुखापतग्रस्त होऊनही संघासाठी शेवटपर्यंत झुंज देतात. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा फलंदाज हनुमा विहारी होय. हनुमा विहारीला मनगटाची दुखापत होऊनही त्याने त्याच्या आंध्रप्रदेश संघासाठी फलंदाजी केली. गतविजेत्या मध्यप्रदेश संघाकडून पराभूत झाल्यामुळे त्याच्या खेळीवर पाणी फेरले गेले. मात्र, त्याने दाखवलेल्या समर्पणाने सर्वांची मने जिंकली.

उपांत्यपूर्व सामन्यात आंध्रप्रदेश संघाला गरज असताना हनुमा विहारी (Hanuma Vihari) याने धैर्य दाखवले. तसेच, एका हाताने फलंदाजी केली. त्याने संघासाठी मोलाच्या धावा काढल्या. मात्र, फिजिओंनी त्याला फलंदाजी करण्यास नकार दिला होता. इतकेच नाही, तर फिजिओंनी त्याला म्हटले होते की, जर आणखी दुखापत झाली, तर तु यापुढे परत खेळू शकणार नाही. त्यानंतर विहारीने जे उत्तर दिले, ते ऐकून सर्वजण हैराण झाले. माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्याशी बोलताना हनुमा विहारी याने याचा खुलासा केला.

‘फिजिओंनी मला 10 वेळा नकार दिला’
आकाश चोप्रा याच्याशी बोलताना सांगितले की, “जेव्हा मी म्हणालो की, मला फलंदाजी करायची आहे. त्यावेळी फिजिओंनी मला 10 वेळा सांगितले की, जर फलंदाजी करताना आणखी दुखापत झाली, तर करिअर धोक्यात येऊ शकते. मी म्हणालो की, या सामन्यानंतर क्रिकेट खेळलो नाही, तर काही हरकत नाही. मात्र, जर या सामन्यात आंध्रसाठी हार मानली, तर हे कायम मनात राहील.”

दुखापतीबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, “मी संपलो होतो, कारण हा उपांत्यपूर्व सामना होता. आंध्रसाठी इतका महत्त्वपूर्ण सामना होता आणि मी फलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हतो. मला वाटले की, जर मी शेवटच्या विकेटसाठी संघासाठी 10 धावा जरी केल्या, तरी याचा फायदा होईल. त्यामुळे मी मैदानात उतरलो. जर तुम्हाला संघासाठी असे करायचे असते, तेव्हा तुम्हाला हिंमत मिळते.”

मध्यप्रदेश संघाने उपांत्यपूर्व सामन्यात आंध्रप्रदेश संघाविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, उपांत्य सामन्यात प्रवेश केला. आता पहिल्या उपांत्य सामन्यात मध्यप्रदेश संघ 8 फेब्रुवारीपासून बंगालविरुद्ध भिडताना दिसणार आहे. (cricketer hanuma vihari made a shocking revelation about his fractured wrist in conversation of akash chopra)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 5 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करताच ‘जड्डू’चा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सर्जरी केली नसती तरी…’
हेच ते देशप्रेम! पत्रकाराचा प्रश्न अन् हरमनप्रीतचा इरादा स्पष्ट; म्हणाली, ‘आमचे लक्ष लिलावावर नाही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---