भारतीय संघ आपल्याच देशात होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांना कंबर कसली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दीर्घ काळानंतर खेळताना दिसणार आहे. मागील आशिया चषकादरम्यान जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सर्जरी करावी लागली होती. या कारणामुळेच त्याला टी20 विश्वचषक 2022मधून बाहेर पडावे लागले होते.
मात्र, आता रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पूर्णपणे फिट झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाशी जोडला गेला आहे. दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा भारताच्या जर्सीत दिसणारा जडेजा खूपच उत्साही आहे. तो जवळपास 5 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. अशात त्याने यादरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
‘गुडघ्याची सर्जरी केली नसती तर झाला असता आणखी त्रास’
बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला की, “मी पुनरागमन करण्यास आणि भारताकडून खेळण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. मी काही काळापासून गुडघ्यामुळे खूपच संघर्ष करत होतो. त्यामुळे मला सर्जरीची खूपच गरज होती. मला हा निर्णय घ्यायचा होता की, सर्जरी विश्वचषकापूर्वी करायची आहे की, नंतर. डॉक्टरांनी सल्ला दिला की, मला विश्वचषकापूर्वी असे करायचे होते, कारण मी सर्जरी केली नसती, तरीही विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे मी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.”
https://twitter.com/BCCI/status/1622197612404416516
जडेजाची गुडघ्याच्या दुखापतीतून सुटका करण्यास एनसीएच्या ट्रेनर आणि फिजिओ यांनी खूप मेहनत घेतली. याचे श्रेय त्यांना देत तो म्हणाला की, “मी खूपच उत्साही आहे. तसेच, 5 महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय जर्सीत आल्यामुळे चांगले वाटत आहे. मी नशीबवान आहे की, मला पुन्हा संधी मिळाली आहे. प्रवासात खूप चढ-उतार राहिले, कारण 5 महिने क्रिकेटपासून दूर राहणे सोपे नाहीये. एनसीएमध्ये जे फिजिओ आणि ट्रेनर होते, त्यांनी माझ्या गुडघ्यावर खूप मेहनत घेतली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही येऊन त्यांनी मला त्यांचा वेळ दिला. मी खुश आहे की, एक सामना खेळल्यानंतर इथे आहे. सर्वांसोबत तयारी करत आहे, त्यामुळे चांगले वाटत आहे. आशा आहे की, इथून पुढे जे काही घडेल, ते चांगले होईल.”
खरं तर, रवींद्र जडेजा याला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर फिटनेस टेस्ट पास करण्यासाठी निवडकर्त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले होते. तिथे त्याने तमिळनाडूविरुद्ध सौराष्ट्र संघाकडून शानदार कामगिरी केली होती. त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यातील 7 विकेट्स या एका डावातील होत्या. आता जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. (all rounder ravindra jadeja opened up on his knee injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेच ते देशप्रेम! पत्रकाराचा प्रश्न अन् हरमनप्रीतचा इरादा स्पष्ट; म्हणाली, ‘आमचे लक्ष लिलावावर नाही…’
‘मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी…’, निवृत्तीच्या 2 वर्षांनंतर रैनाच्या मनातलं आलं ओठांवर





