इंग्लंडच्या एका विस्फोटक फलंदाजाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी संघात जागा मिळाली नाही. मात्र, आता त्याच पठ्ठ्याने ‘द हंड्रेड‘ लीगमध्ये भीमपराक्रम केला आहे. हा फलंदाज इतर कुणी नसून हॅरी ब्रूक आहे. हॅरी ब्रूक द हंड्रेड लीगमध्ये चांगलाच चमकला असून त्याने वादळी शतक ठोकले आहे. त्याच्या या शतकामुळे सगळेच विक्रम मोडले गेले आहेत. मात्र, त्याची ही खेळी संघाला सामना जिंकून देऊ शकली नाही.
खरं तर, इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेतील 30वा सामना नॉर्दर्न सुपरचार्जर्स विरुद्ध वेल्श फायर (Northern Superchargers vs Welsh Fire) संघात पार पडला. या सामन्यात हॅरी ब्रूक (Harry Brook) याने सुपरचार्जर्सकडून ऐतिहासिक शतक ठोकले. त्याने अवघ्या 42 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी साकारली. यादरम्यान त्याने 7 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 250 इतका होता. ब्रूकव्यतिरिक्त ऍडम होस (15) सोडला, तर संघाचा इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही.
Every. Ball. Counts.
Harry Brook has done it 💥#TheHundred pic.twitter.com/iCC6FbKVkG
— The Hundred (@thehundred) August 22, 2023
स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक
हॅरी ब्रूक द हंड्रेड (Harry Brook The Hundred) स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. याव्यतिरिक्त तो सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाजही बनला आहे. त्याच्यापूर्वी या लीगमध्ये विल जॅक्स आणि विल स्मीज यांनी शतकी खेळी साकारल्या आहेत. मात्र, इतके वेगवान शतक कुणालाही करता आले नव्हते. ब्रूकने पीएसएल आणि आयपीएलमध्येही शतक झळकावले आहे. मात्र, आयपीएलमधील त्याची आकडेवारी तितकी चांगली राहिली नव्हती.
वेल्श संघाकडून पराभव
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर हॅरी ब्रूकने शतक केले (Harry Brook Century) आणि याच जोरावर नॉर्दर्न सुपरचार्जर्स ( Northern Superchargers) संघ प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 158 धावा करू शकला. हे आव्हान वेल्श फायर संघाने वादळी फलंदाजी करत 90 चेंडूतच पार करत 8 विकेट्सने जिंकला. वेल्शकडून स्टीफन एस्किनजीब याने 28 चेंडूत 58 धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो याने 39 चेंडूत 44 आणि जो क्लार्क याने 22 चेंडूत 42 धावांची वादळी खेळी केली. (cricketer harry brook smash fastest hundred the hundred league history read here)
हेही वाचा-
वनडे वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडची जोरदार तयारी! एकसाथ 4 दिग्गज कोचिंग स्टाफमध्ये
‘त्याच्याबद्दल बोलूच नका…’, Asia Cupसाठी संघात न घेतलेल्या अश्विनबद्दल ‘हे’ काय बोलून गेले गावसकर