---Advertisement---

बेअरस्टोसोबत कन्फ्युजन, तरीही हवेत झेप घेत हॅरी ब्रूकने पकडला सुपरमॅन कॅच, तुम्ही पाहिला का?

On: रविवार, जुलै 9, 2023 5:12 PM
Harry-Brook
---Advertisement---

हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. खेळपट्टीतून मिळणारा मदतीचा फायदा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या डावात 224 धावांवर लोळवले. ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांनी आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना घाम फोडला. मात्र, वोक्स आणि वूड यांच्या गोलंदाजीसह तिसऱ्या दिवशी हॅरी ब्रूक यानेही शानदार झेल घेत वाहवा लुटली. आता त्याच्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ब्रूकचा शानदार झेल
झाले असे की, तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील खेळ उशिरा सुरू झाला. यावेळी ख्रिस वोक्स याने 13 चेंडूंच्या आत मिचेल मार्श आणि त्यानंतर ऍलेक्स कॅरे यांना तबूचा रस्ता दाखवला. मात्र, यानंतर मिचेल स्टार्क याने ट्रेविस हेड याची चांगली साथ दिली आणि 16 धावाची खेळी साकारली. स्टार्कच्या खेळीचा शेवट मार्क वूड याने आपल्या जबरदस्त उसळी चेंडूने केला.

वूड याचा उसळी चेंडू स्टार्कला समजलाच नाही. त्यामुळे चेंडू बॅटची कड घेत हवेत उडाला. यावेळी शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या हॅरी ब्रूक (Harry Brook) याने वेगाने धाव घेतली. मात्र, तिथे अचानक यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो याला येताना पाहून तो थांबला. मात्र, बेअरस्टो पुढे येत नसल्याचे पाहून ब्रूकने हवेत उडी मारली आणि शानदार झेल पकडला.

इंग्लंडच्या त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलिया ढेर
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तीन वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना घाम फोडला. या गोलंदाजांमध्ये स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश होता. ब्रॉन डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड आणि टॉड मर्फी या तिघांची विकेट काढली. तसेच, वोक्सने पहिल्या डावातील शतकवीर मिचेल मार्श आणि ऍलेक्स कॅरे यांना अवघ्या 13 चेंडूंच्या आत तंबूत धाडले. त्याने उस्मान ख्वाजा याचीही विकेट घेतली. तसेच, मार्क वूड याने ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांना क्रीझवर सेट होण्याची कोणतीच संधीच दिली नाही. (cricketer harry brooks took stunner catch of mitchell starc on day 3 of third test match at headingley ashes 2023)

महत्वाच्या बातम्या-
लो स्कोरिंग मॅचमध्ये चमकली हरमप्रीत कौर! बांगलादेशविरुद्धची पहिली टी-20 मॅच 7 विकेट्सने जिंकली
जेव्हा धोनी माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला म्हणालेला, ‘वहिनी मला फक्त 30 लाख कमवायचे आहेत, कारण…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---